वसई : वसई विरार महानगर पालिकेने प्लॅस्टिक विक्रेत्याला केलेला ५ हजाराचा दंड चिल्लरमध्ये भरला आहे. ही चिल्लर मोजता - मोजता अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली. आज दिवसभर या बातमीने वसईत याचीच चर्चा सुरू होती.अमित मेहता यांच्या दुकानावर धाड टाकून मनपा अधिकाºयांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या व त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला. त्यांनी ही रक्कम आपल्याजवळील दोन, पाच व दहा रुपयांच्या नाण्याच्या स्वरुपात भरली. ती मोजून घेताना अधिकाºयांचा चांगलाच घाम निघाला. यावेळी चिल्लर मोजताना त्यातील ७० रु पये कमी असल्याचे आढळले. मात्र ती ही रक्कम त्याने चिल्लरमध्येच भरल्याने हा व्यापारी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हि चिल्लर तीन प्लॅस्टिकच्या थैल्यांमध्ये भरून तो व त्याचे नोकर महापालिका सहआयुक्त सुखदेव दरवेशी यांच्या दालनात आले होते.‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मकरंद अनासपुरे याच्या चित्रपटाची यानिमित्ताने सर्वांना आठवण झाली. या चित्रपटातील निवडणुकीची अनामत रक्कम चिल्लरमध्ये भरतानाचे दृश्य चांगलेच गाजले होते.।नालासोपारा, आचोळा येथील एका प्लॅस्टीक वितरकाच्या दुकानावर आम्ही कारवाई केली होती.त्यावेळी त्याने दंड म्हणून हे कॉईन दिले. मात्र त्यातही ७० रूपये कमी असल्याचे त्याला फोन करून सांगितल्यावर त्याने ते प्रामाणकिपणे कार्यालयात आणून जमा केले.- सुखदेव दरवेशी, सहा आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका
व्यापाऱ्याने पाच हजाराचा दंड भरला चिल्लरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:54 IST