शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 17:55 IST

शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे . एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यातील पोलीस कोरोनाग्रस्त झाले असून ते रुग्णालयात व कोविड केअर मध्ये उपचार घेत आहेत . 

 

शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . त्या भागातील लोकं लॉकडाऊनचे पालन करत नाहीत म्हणून सुरवातीला तक्रारी असत . परंतु नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे सह पोलिसांनी नया नगर मध्ये विविध उपायोजना आणि कारवाई करून लॉकडाऊन काटेकोर अमलात आणले . जेणे करून नया नगर भागात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्य झाले होते .  

 

परंतु या आठवड्या भरात नया नगर पोलीस ठाण्याचे एका पाठोपाठ एक असे तब्बल 18 पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत . स्वतः बर्वे यांच्या सह अन्य तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 14 पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लग्न झाल्याचे चाचणी अहवालातून निष्पन्न झाले आहे . एकाच वेळी इतके पोलीस कोरोनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. 

 

 आधीच पोलीस ठाण्यातील पोलीस बळ 80 इतके कमी असताना त्यात १८ पोलीस अधिकारी व कमर्चारी कोरोना मुळे कर्तव्यावर हजर राहू शकणार नाहीत . त्यातच लॉकडाऊन खुले केल्याने लोकां कडून निर्देशांचे होणारे उल्लंघन आदींवर नियंत्रण ठेवणे अवघड जाणार आहे . तर हे सर्व पोलीस लवकरच कोरोनातून बरे होऊन परत सेवेत यावेत अश्या सदिच्छा व्यक्त होत आहेत . या आधी देखील 13 पोलीस कोरोनाग्रस्त झाले होते . त्यामुळे नया नगर पोलीस ठाण्यातील आता पर्यंत एकूण 31 पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस