शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 05:35 IST

इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला.

मंगेश कराळे

नालासोपारा : खरं तर १६ महिन्यांचा चिमुरडा रियान मुंबईतला, पण आजीकडे पेल्हार येथे राहायला आला होता. खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला, दैव बलवत्तर म्हणून वाचला खरा, पण मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी त्या बाळाचा जीव घेणारी ठरली.

इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार घरच्यांनी गुरुवारी दुपारी रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी मुंबईतील हाॅस्पिटलची वाट धरली. गंभीर जखमी असला तरी बाळाची काहीशी हालचाल सुरू होती. मुंबईत पोहोचताच उपचार करून आपले बाळ वाचेल, अशा आशेने त्यांनी देवाचा धावा सुरू केला. पण  सुमारे पाच तास रुग्णवाहिका कोंडीत अडकली आणि बाळाची हालचाल हळूहळू थांबू लागली.  अखेर घरच्यांनी जवळपास असलेले ससूनवघर गावातील रुग्णालय गाठले, पण त्यापूर्वीच बाळाचे प्राणपखेरू उडून गेले होते.

गुरुवारी दुपारी एक-दोनच्या दरम्यान पेल्हार रुग्णवाहिका निघाली, पण महामार्गावरील वाहतूक कोंडीत ती अडकून पडली. रुग्णवाहिकेला पुढेही जाता येईना, ना मागे, अशी विचित्र स्थिती झाली. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, रुग्णवाहिका मात्र पुढे जात नव्हती.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. वाहतूक कोंडीमुळे झाले, असे म्हणता येणार नाही. वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी व मुख्य सचिवांना कळविले आहे.

स्नेहा दुबे पंडित, आमदार, वसई