शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

तलासरीत आज १९ संघटना एकवटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:49 IST

विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महाराष्ट्र-गुजरात मधील १९ संघटना तलासरी येथे ९ आॅगस्टला आंदोलन छेडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरणाला उध्वस्त करणाºया प्रकल्पांविरोधात महाराष्ट्र-गुजरात मधील १९ संघटना तलासरी येथे ९ आॅगस्टला आंदोलन छेडणार आहेत.भांडवलदारांसाठी सरकार १८ औद्योगिक कॉरिडोर लादत आहेत. एकट्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी ४ लाख ३६ हजार ४८६ म्हणजे देशाच्या एकूण भूमीपैकी १३.८ % भूमी (गुजरातची ६२ %, महाराष्ट्राची १८% त्याने बाधित होेणार आहे. आपल्या देशाच्या १७ % लोकसंख्येला हा महाकाय प्रकल्प उध्वस्त करणार आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान यातील आदिवासी बेदखल होणार आहेत. आधीच प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्वच संपणार आहे. या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग, विकास आराखडा, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग भूमीपुत्रावर लादले जात आहेत. त्यासाठी पालघर, ठाणे जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव असलेले पाणी पळवले जात आहे. वाढवण बंदर तसेच सागरी महामार्ग हे मच्छीमार, शेतकºयाच्या मुळावर उठले आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वाढवणला जेएनपीटी पेक्षा मोठे बंदर होऊ घातले आहे. त्याच्यासाठी जंगल कापून, डोंगर फोडून समुद्रात भराव टाकून ५ हजार एकर जमीन तयार केल्याने संपूर्ण किनारपट्टी, शेतीवाडी, फळबागा उध्वस्त होणार आहेत. तसेच गुजरात मध्ये नारगोल बंदरच्या विकास व विस्ताराच्या नावाखाली शेकडो एकर शेत जमीन घेतली जात असून हजारो मच्छीमार व शेतकरी कुटुंब उध्वस्त होणार आहेत.पालघर-ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे तसेच गुजरात, दादरा नगर हवेली मधील १६३ गावातील शेत जमीनी घेण्याचा डाव आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा लोकल ट्रेन प्रवास सुसह्य करण्याऐवजी ८ तासाचा प्रवास अडीच तीन तासांवर आणण्यासाठी जनतेचे तब्बल १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लादली जात आहे. यालाच आंदोलकांचा विरोध आहे.महाराष्टÑ, गुजरातमधील आदिवासींचा असेल सहभाग९ आॅगस्ट या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन तसेच आॅगस्ट क्र ांती दिनाच्या निमित्ताने तलासरी येथे एस.टी.डेपो मैदानात दुपारी ११ वा. जमून सर्व विनाश प्रकल्पांना ‘‘चले जावं’’ इशारा देण्यासाठी ‘भूमिपुत्र बचाव आंदोलना’ च्या झेंड्या खाली भूमी सेना, आदिवासी एकता परिषद, खेडुत समाज (गुजरात), शेतकरी संघर्ष समिती, वाढवणं बंदर विरोधी संघर्ष समिती,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, सुर्या पाणी बचाव संघर्ष समिती, पर्यावरण संवर्धन समिती वसई, पर्यावरण सुरक्षा समिती, गुजरात, आदिवासी किसान संघर्ष मोर्चा, गुजरात, कांठा विभाग युवा कोळी परिवर्तन ट्रस्ट, सूरत,खेडुत हितरक्षक दल, भरु च,भाल बचाव समिती गुजरात, श्रमिक संघटना, प्रकृती मानव हितैषी कृषी अभियान, सगुणा संघटना व युवा भारत या १९ संघटना एकजुटीचे दर्शन घडवून तलासरीमध्ये बुधवारी आंदोलन छेडणार आहेत.