शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-डहाणू मेमूची वेळ आजपासून बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 04:02 IST

पनवेलहून विरारकडे कधीही वेळेवर न येणाºया ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूची वेळ पश्चिम रेल्वेने बदलल्याने प्रवाशांना दिलासा लाभला आहे.

पालघर: पनवेलहून विरारकडे कधीही वेळेवर न येणा-या ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूची वेळ पश्चिम रेल्वेने बदलल्याने प्रवाशांना दिलासा लाभला आहे.विरार स्थानकावर पनवेल डहाणू मेमूची रात्री येण्याची जुनी वेळ ८.३४ होती ती बदलून आता ९.१० करण्यात आली आहे तसेच ९.१० मिनिटांनी विरार वरून सुटणा-या लोकलची सुधारीत वेळ ८.३५ करण्यात आली आहे. हे बदल दि १ नोव्हेंबर २०१७ बुधवारपासून अमलात येणार आहेत.सातत्याने उशिरा येणार्या या गाडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या गाडीची वेळ बदलण्याबाबत नागरिकांनी व प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे अनेकदा मागण्या केल्या होत्या.डहाणू वैतरणा प्रवासी संस्थेनेही याबाबत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेतली होती. व या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे सुचवून व यासंबंधीचा पाठपुरावा वरिष्ठ अधिकाºयांकडे केला होता. यावर रेल्वेच्या अधिकाºयांनी या पनवेल डहाणू मेमूला ही समस्या मध्यरेल्वेमुळे भेडसावत असल्याचे सांगितले,मात्र संस्थेच्यावतीने मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांशी सतत संपर्क व समन्वय साधून मेमूची वेळ बदलावी ही मागणी उचलून धरली होती, अखेर रेल्वेने प्रवाशांचे व प्रवासी संस्थेचे म्हणणे मान्य करून पनवेल डहाणू मेमूच्या वेळेत बदल केल्याचे पश्चिम रेल्वेने सूचित केले आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी