शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या छातीतून तीन किलोचा काढला ट्युमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 02:03 IST

Health News : कोरोनाच्या संकटात अनेकांनी उपचार पुढे ढकलले  तर काहींनी थांबविले. त्यामुळे  अनेक समस्या वाढल्या आणि या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना आव्हानात्मक झाले आहे.

नालासोपारा : कोरोनाच्या संकटात अनेकांनी उपचार पुढे ढकलले  तर काहींनी थांबविले. त्यामुळे  अनेक समस्या वाढल्या आणि या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना आव्हानात्मक झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कठीण शस्त्रक्रिया बोरिवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली. विरार येथील ६५ वर्षीय रेश्मा खन्ना (नाव बदलले आहे) यांना जीवनदान मिळाले आहे.रेश्मा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. स्कॅन चाचणी केल्यानंतर त्यांच्या छातीत गाठ असल्याचे समोर आले. सिटी स्कॅन व इतर चाचण्या केल्यानंतर छातीच्या डाव्या बाजूला एक ट्युमर आढळून आला. हा ट्युमर मोठा असल्याने फुफ्फुसाच्या झडपांवर त्याचा ताण येत होता. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ व शल्यविशारद डॉ. आदित्य मानके म्हणाले, हा ट्युमर हृदय व फुफ्फुसाच्यामध्ये होता. अशा शस्त्रक्रिया जोखमीच्या मानल्या जातात. रुग्णाचे वय व शारीरिक स्थिती पाहता त्यांचा जीव वाचविणे कठीण बाब होती, परंतु आमच्या टीमने हे आव्हान स्वीकारून सलग सहा तास शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढला. हा ट्यूमर तीन किलोचा होता. डॉ. झकी बेल्लारी, डॉ. शार्दुल मलकानी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सागर गायकवाड यांनी या शस्त्रक्रियेत फार महत्त्वाची भूमिका बजावली. 

टॅग्स :Healthआरोग्यVasai Virarवसई विरार