शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांवर तीन नवे कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:29 IST

वसई-विरार महापालिकेने रहिवाशांवर नव्या करांचा बोजा लादला आहे.

पारोळ : वसई-विरार महापालिकेने रहिवाशांवर नव्या करांचा बोजा लादला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठीचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे पालिकेने जनतेवर प्रति मालमत्ता चार रु पयांचा उपभोक्ता कर लावला आहे. इंधन दरवाढीचे कारण देऊन परिवहनच्या तिकीटदरांतही वाढ करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकांवर सांडपाणी प्रकल्पासाठी कर लावला गेला आहे.बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे तिन्ही प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आले. केवळ शिवसेनेच्या गटनेत्याने ही करवाढ जनतेसाठी अयोग्य असल्याचे सांगून विरोध केला.कचरा करताय, ४ रु पये भरा!वसई-विरार शहरात दररोज ६५० टन कचरा जमा होतो. तो उचलणे, कचराभूमीवर नेणे आणि तेथे त्याचे विघटन करणे या कामासाठी महापालिकेला वर्षांला १७६ कोटी रुपये खर्च येतो. प्रत्येक नागरिक हा दिवसाला ४५० ग्रॅम कचरा निर्माण करीत असतो. त्यामुळे महापालिकेने नागरिकांवरच कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. स्वच्छ भारत अभियानामध्ये ही तरतूद असल्याचे आयुक्तांनी सांगितले. हा नवीन कर नसून सेवाकर असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका इतर कर आकारत असतांना हा कर का घेते, असा सवाल करून शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी विरोध केला.शहरात साडेसहा लाख मालमत्ता असून दर महिन्याला त्यांच्यावर चार रुपये आकारले जाणार आहे, असे सांगून हा विरोध फेटाळून लावला. केबलला महिन्याला ४00 रु पये देता मग कचरा निर्मूलनासाठी ४ रुपये भरायला विरोध का, असा सवाल नगरसेवक पंकज ठाकूर यांनी केला.विकासकांवरील कराला मात्र हरकत : पालिकेने २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करणाऱ्या विकासकांवर सांडपाणी प्रक्रि या कर आकारण्यासही मंजुरी दिली दिली आहे. महापालिकेकडे सध्या विरार येथे ३० दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रकल्प आहे. विकासकाने तयार केलेला प्रकल्प या प्रकल्पाला जोडला जाणार आहे. शहरात सात ठिकाणी सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित आहे. मग केवळ विरारमध्येच सांडपाणी प्रकल्प असताना सर्व विकासकांवर हा कर का, अशी हरकत काही सदस्यांनी घेतली होती. स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी या प्रश्नावर बोलतांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाप्रमाणे याची गत होऊ नये, अशी टीका केली.>बसप्रवास महागल्याचे समर्थन, विरोधकांनी पाळले मौनपरिवहन सेवेच्या दरवाढीच्या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र हे दर जास्त असल्याचा आक्षेप शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी घेतला सर्वसामान्य परिवहनच्या बसमधून प्रवास करतो. त्यामुळे त्याला ही दरवाढ जाचक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक उमेश नाईक यांनी दरवाढीचे समर्थन केले. परिवहन संचालकांनी २०१६ मध्ये सुचविल्याप्रमाणेच ही दरवाढ करीत असल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले असले तरी २०१६ च्या निर्देशनानुसार ही वाढ केली जात आहे, असे सांगून इतर महापालिकेपेक्षा ती कमीच असल्याचे त्यांनी सांगितले. ही दरवाढ स्थानिक नागरिकांच्या हिताची असल्याचेही ते म्हणाले. मात्र इतरांनी परिवहनच्या दरवाढीबद्दल मौन बाळगले आणि दरवाढीचा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.