शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आरोग्य विभागाचे तीनतेरा

By admin | Updated: October 8, 2015 23:14 IST

९५ टक्के आदीवासी बहुल अतिदुर्गम, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा अशा व डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात आरोग्य सुविधेसाठी, पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक आरोग्य व उप-आरोग्य

जव्हार : ९५ टक्के आदीवासी बहुल अतिदुर्गम, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा अशा व डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात आरोग्य सुविधेसाठी, पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक आरोग्य व उप-आरोग्य केंद्रावरच येथील जनतेला अवलंबून राहावे लागते. कुपोषण, दुषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असते. सर्पदंश, गरोदर माता व गंभीर रुग्णांना परिवहनाच्या अपुऱ्या साधनांमुळे अनेक वेळा डोलीने आजही उपचारासाठी रुग्णालयात आणावे लागते.परंतु त्या शासकीय दवाखान्यातील आधीच अपुऱ्या व बहुसंख्य रिक्त असणाऱ्या पदांमुळे नातेवाईकाना रुग्णाला घेऊन रात्री अपरात्री जव्हार ग्रामीण रुग्णालयात आणावे लागते. गंभीर बाब म्हणजे त्या आरोग्य केंद्रा बाहेर रुग्णासाठीची शासकीय जीप उभी असते परंतु त्या जीप ला चालकच नसल्यामुळे रुग्नाला पदरमोड करून भाड्याच्या गाडीने जव्हारला आणावे लागते. आरोग्य व्यवस्थेच्या या रामभरोसे कारभारा मुळे आजतागायत शेकडो गरोदर माता, बालके, अपघातग्रस्त व साथीच्या रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत परंतु शासन दरबारी या मृत्यूंची नोंद ही वाटेत मृत्यू होत असल्यामुळे यापुढे अशा मृत्यूंचीनोंद ही शासनाने अनास्थेमुळे झालेले मृत्यू अशी करावी अशी मागणी श्रमजीवीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी गुरुवारी येथे केली. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य विभागावर, केंद्र व उप-केंद्रांवर नियंत्रण ठेवणारे तालुका आरोग्य अधिकारी पद अनेक महिने रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागच व्हेन्टिलेटरवर असल्याची टीकाही त्यांनी केली. जव्हार शासकीय विश्राम गृहात विवेक पंडित यांनी श्रमजीवीच्या तालुका व शहर पदाधिकार्यांकडून तालुक्यातील आरोग्य समस्येबाबत आढावा घेतला. तालुक्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रे येथील रिक्त पदे तात्काळ भरावेत यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.जव्हार तालुका आरोग्य विभागसंवर्गमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदेतालुका आरोग्य अधिकारी१०१वैद्यकीय अधिकारी गट (अ)४४०वैद्यकीय अधिकारी गट (ब)९५४विस्तार अधिकारी (आरोग्य)२११आरोग्य पर्यवेक्षक११०आरोग्य सहाय्यक (पुरूष-जि. प)१०१००आरोग्य सहाय्यक (पुरूष- राज्य)३३०आरोग्य सहाय्यक (स्त्री)८५३औषध निर्माता अधिकारी८५३प्रयोगशाळा तंत्रज्ञ४४०कुष्टरोग तंत्रज्ञ११०आरोग्य सेवक (पुरूष-जि.प)१९१४५आरोग्य सेवक (पुरूष-राज्य)१२१२०आरोग्य सेवक (म)३९३२७कनिष्ठ लिपीक५४१वाहन चालक९२७शिपाई२६१७९सफाई कामगार८२६एकूण१६९१२२४७