शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 03:00 IST

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता.

नालासोपारा - वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रु पयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. या थकीत रकमेची वसूली कशी करायची असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीज जोडण्या आहेत. त्यात २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रूपयांची वीज थकबाकी असल्यची माहिती महावितरणाने दिली आहे. त्यामुळे या आॅक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोट्यवधींच्या घरात जात असून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे. त्यामुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.महावितरणची एकूण ५१ कोटी रु पये इतकी वीजबिलांची थकबाकी असून थकबाकी वसूल करण्याचे काम सुरु च आहे. येत्या ३१ आॅक्टोबर पर्यंत ५० टक्के इतकी तरी रक्कम वसूल करण्याचे ध्येय आमच्या विभागाने ठेवले असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली होती. या आकडेवारीचा बोझा कंपनीवर आहे.ज्यांची वीज बिले थकीत आहेत ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज बील हे वेळेवर न देता ते बिलाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत असतो. यावर अनेक वेळा तक्र ारी करूनही वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.१७८ कोटीची आतापर्यंत झाली वसुलीमहावितरण कंपनी बाकी असलेल्या थकीत बिलांची रक्कम योग्य रित्या वसूल करण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.वसई, विरार, सोपारा, वाडा अशा तीन विभागात महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. आॅक्टोबर महिन्यात २१८ कोटीचे उद्दीष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक अभियंत्यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरार