शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

वसईत CAB आणिNRC विरोधात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय संविधान बचाव समितीचा धडकला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 22:02 IST

बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.

वसई -  बहुचर्चित CAB आणि NRC च्या विरोधात शुक्रवारी वसईत सर्व धर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसिलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रखर निषेध नोंदवण्यात आला.वसई पापडी येथील हुतात्मा स्मारक तथा टी.बी.कॉलेज येथून एनआरसी तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा- 2019 हा त्वरित रद्द व्हावा,तसेच भारतीय संविधांनाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये, जवळपास वीस हजारांच्या संख्येने सर्वधर्म बांधव आणि खास करून मुस्लिम समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता.अवघ्या वसई तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून समस्त मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हजर राहिला, एकूणच शुक्रवारी दुपारी 3 वाजता वसई पूर्व येथून आणि पुढे वसई शहरातील पापडी भागात मुख्य रस्त्यावरून हा मूक मोर्चा वसई तहसीलदार कार्यालयावर धडकला.  यावेळी केंद्र सरकार,देशाचे पंतप्रधान,गृहमंत्री यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला गेला,यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.तर दुपारी वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांशी शहरातून निघालेल्या या मोर्च्या मुळे वसई नालासोपारा विरार आदी शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.हा मूक मोर्चा साधारण संध्याकाळी 6 वाजता वसई तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर पोहचल्यावर या मोर्च्याचे छोट्या सभेत रूपांतर झाले आणि त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारचा निषेध नोंदवत वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना देण्यात आले,याप्रसंगी वसई तहसीलदार यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना सर्वधर्मीय प्रतिनिधींनी केंद्र सरकार जाणीवपूर्वक ठराविक इतर समाज व खास करून मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा गंभीर आरोप, यावेळी समस्त सर्वधर्मीय मोर्चेकऱ्यांनी केला.दुपारी 3  वाजता काढण्यात आलेल्या या प्रशस्त मूक मोर्चामध्ये, मुस्लीम समाजासोबत अन्य समाजातील अनेक धर्मीय नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्त्ते आणि हजारो नागरिक बहुसंखेने सहभागी झाले असल्याची माहिती सर्वधर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने समनव्यक समीर वर्तक यांनी लोकमत दिली, याउलट हा मूक मोर्चा वसईच्या कानाकोपऱ्यातून निघाला होता.तरी हा मोर्चा वसई गावात पोहचे पर्यंत अत्यंत शांततेत तो गेला कुठंही कुठलाही अनुचित प्रकार अथवा हिसंक वळण त्यास लागले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले,तर सोबत या मोर्च्याला वसईत मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं हा मोर्चा यशस्वीरीत्या व उत्तम शिस्त बद्ध नियोजन असल्यानं आम्ही वसई तहसील पर्यंत पोहचलो असल्याची प्रतिक्रिया समितीनं लोकमत ला दिली,."केंद्र सरकारच्या संविधान विरोधी कृतीमुळे संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरला असून संबंध देश व राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.पूर्वोत्तर राज्यापासून सुरु झालेले हे आंदोलन आता संपूर्ण देशात पसरले आहे,तर देशातला तरुण परिणामांची चिंता व पर्वा न करता आपला देश ,आपले संविधान वाचविण्यासाठी खऱ्या अर्थी आज भारत मातेच्या या भूमीवरील रस्त्यावर उतरला आहे.समन्वयक - समीर वर्तकसर्वधर्म संविधान बचाव समिती,वसई तालुका     ."या मूक मोर्च्या साठी आम्ही अगोदरच वसईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता,त्यातच  वाहतुकीचे उत्तम नियोजन व त्याची आखणी करून हि ठेवली होती.त्यामुळे कुठंही फार काळ वाहतूक कोंडी राहिली नाही,अथवा वसई विरार मध्ये कुठंही अनुचित प्रकार अथवा काही अप्रिय घटना घडली नाही सर्वत्र शांतते त हा मोर्चा गेला सर्वांनी सहकार्य केल्यानेच आम्ही उत्तम नियोजन करू शकलो,"-  विजयकांत सागर  अप्पर पोलीस अधीक्षक,वसई

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकVasai Virarवसई विरार