शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तेरावर्षीय प्रचीतीने केले १०० गड सर; तालुक्यात कौतुकाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:33 IST

वसईतील मूळगाव- केरेपोंडे या गावात राहणारी प्रचीती दीपक म्हात्रे हिला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. जणू तिला वेडच आहे. ती उत्तम कबड्डीपटूदेखील आहे.

पारोळ : गिरिभ्रमण अर्थात ट्रेकिंग हा एक सर्वांगसुंदर छंद आहे. न‌िसर्गाची ओढ आणि इतिहासाची आवड, यामुळे वसईतील तेरा वर्षीय प्रचीती म्हात्रे ट्रेकिंगकडे कधी ओढली गेली, हे तिलाही कळले नाही. गेल्या चार वर्षांत तिने एक-दोन नव्हे, तर तब्बल १०० गडकोट पादाक्रांत केले आहेत. डिसेंबर महिन्यात तिने सिंहगड ते राजगड, असा नऊ तासांचा पायी प्रवास करत गडकोटांची शंभरी पार केल्याने तालुक्यात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.वसईतील मूळगाव- केरेपोंडे या गावात राहणारी प्रचीती दीपक म्हात्रे हिला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. जणू तिला वेडच आहे. ती उत्तम कबड्डीपटूदेखील आहे. वसईतील कार्मलेट काॅन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलमध्ये ती आठव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अनेक गडकोटांची शृंखला दडलेली आहे, हे जेव्हा वसईतील मूळगावच्या या चिमुरडीला कळले, तेव्हा आई प्रगती आणि मोठी बहीण ध्रुवालीसोबत शाळा ते ट्यूशन या प्रवासात कबड्डीची प्रॅक्टिस आणि यातून वेळ काढून या जादूभरल्या वाटेवर ती हिंडायची. गेल्या चार वर्षांत तिने शेकडो किल्ल्यांची भटकंती पूर्ण केली आहे. हे किल्ले पाहताना कष्टप्राय वाटा, मनाचा संयम आणि शारीरिक क्षमता या साऱ्यांशी हातमिळवणी करून अनेक ट्रेक केले. त्यात तोरणा, शिवनेरी, सारसगड, रायगड, साल्हेर सालोटा, मोरा मुल्हेर, हरगड किल्ल्यांची वारी, कोरीगड, घनगड, बाहुला गड, हडसर किल्ल्यावरच्या खुंट्याच्या वाटेने चढाई, अशा अनेक गड-किल्ल्यांचा समावेश आहे.दुर्गभ्रमणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ जायला मिळतेच आण‌ि त्याचबरोबर इतिहासही अनुभवता येतो. ट्रेकिंगने मला शिवाजी महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याचा आण‌ि पराक्रमाचा इतिहास जवळून पाहण्यास आण‌ि अनुभवण्यास मिळाला, हे मी माझे भाग्य समजते. २०१५ पासून शिवरायांच्या स्वराज्याचा कणा असलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील गडकोट पाहत असताना जे काही मानसिक समाधान मिळाले त्याची तुलना तर कशाशीही होऊ शकत नाही -प्रचीती म्हात्रे