शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वसई-विरारला तिसरे धरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:06 AM

महासभेत मिळाली मान्यता; प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाकडे पाठवण्याचा मार्ग मोकळा

वसई : वसई - विरार शहराचे वाढते नागरीकरण पाहता भविष्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी खोलसापाडा पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचे पाणी वसई - विरार शहरासाठी आरिक्षत करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेल्हार आणि पापडखिंड या दोन मालकीच्या धरणानंतर स्वत:चे असे तिसरे खोलसापाडा नामक धरण वसई - विरार मनपाला मिळणार आहे.वसई-विरार महापालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, याकरिता वसई - विरार महापालिका पाण्याच्या विविध योजनांवर काम करत आली आहे. यात सर्वप्रथम सूर्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:चे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले. तर दुसºया बाजूला वसई पूर्वेतील राजावली, तिल्हेर आणि सातिवली येथे साठवण तलावाच्या कामांना गती दिली असतानाच आता लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत खोलसापाडा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा आणि त्याच्या आर्थिक खर्चाचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे ११० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.शहर पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खोलसापाडा हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत आहे. या प्रकल्पाचे जवळपास शंभर टक्के पाणी हे वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या परिसरातील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. विशेषत: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणी उपलब्ध करून देणे मनपाला अधिक सोयीचे होणार आहे.प्रशासनाची खर्चास मंजुरीया खोलसापाडा - १ या पाटबंधारे प्रकल्पास पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबत तसेच प्रकल्पाचा अंदाजे ११० कोटींचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव वसई-विरार मनपाच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यास तसेच आर्थिक खर्चास सभेची मंजुरी मिळाल्याने आता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यामार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.कसा असेल प्रकल्प !7.80 चौ कि मी पाण्याच्यासाठ्याची एकूण व्याप्ती13.64 दशलक्षघनमी एकूण पाणीसाठा क्षमता12.8183 दशलक्षघनमी पिण्याचेपाणी होणार उपलब्धकाय असतील तरतुदी !या प्रकल्पाची १०० टक्के मालकी ही वसई - विरार मनपाची असेल. या धरणातील १०० टक्के पाणी हे याच महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. या प्रकल्पातून उचलण्यात येणाºया पाण्याचे स्वामित्वधन महानगरपालिकेकडून घेऊ नये, आणि पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून याबाबतीत काम पाहील अशा तुर्तास तरी तरतूदी रहातील. मात्र कोकण पाटबंधारे विभाग प्रत्यक्ष कामाच्या वेळी मार्गदर्शक राहील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार