शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार सोडला’; जीवदान देणारा ठरला ‘मदर्स डे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:14 IST

त्यामुळे ‘मदर्स डे’च्या दिवशी ती आत्महत्या करायला निघालेली असताना या ओळखीच्या झालेल्या लोकांमुळेच जणू तिला जीवदान लाभले.

अशोक पाटील -कुडूस : ‘मदर्स डे’चा दिवस तिला तिच्या जीवनात दिशा देणारा ठरला. एका ६२ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. तिचा धीर खचला; पण ती महिला अनेक वर्षांपासून वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने तिची वज्रेश्वरीतील काही लोकांशी ओळख झाली. त्यामुळे ‘मदर्स डे’च्या दिवशी ती आत्महत्या करायला निघालेली असताना या ओळखीच्या झालेल्या लोकांमुळेच जणू तिला जीवदान लाभले.सुमन अशोक झित्रे (वय ६२) यांचे मुंबईत एका चाळीमध्ये संपूर्ण जीवन गेलेले. पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना एकच मुलगी होती, अशी परिस्थिती असताना, थकलेल्या शरीरामुळे काही काम करण्याचे त्राण उरले नव्हते. अशा विमनस्क स्थितीत काय करावे, असा विचार मनात कवटाळून सुमन वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आली. दर्शन घेऊन ‘आता  माते मी आत्महत्या करीत असल्याने पुन्हा तुझ्या दर्शनाला येणार नाही म्हणून हात जोडून नमस्कार केला.’ देवीच्या मनात वेगळेच असल्याने तिची ही कृती तिथे उभ्या असलेल्या यूट्यूबवर चित्रण करणाऱ्या स्वप्नील शिंदे यांनी टिपली. चित्रण थांबवून सुमन यांच्याजवळ जाऊन तिची परिस्थिती समजून घेतली व  स्वप्नीलने रुग्णमित्र मिलिंद कांबळे यांच्या साहाय्याने सुमन या असाह्य बेघर झालेल्या महिलेला अनाथाश्रमाचे मालक किसन लोखंडे याच्याकडे राहण्या- खाण्याची सोय केली. अशा प्रकारे ‘मदर्स डे’ या महिलेच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. 

टॅग्स :palgharपालघरMothers Dayमदर्स डे