शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

महोत्सवावर एक चित्रपट बनेल

By admin | Updated: December 28, 2016 04:18 IST

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवामुळे येथील वातावरण क्रीडा आणि कलामय होऊन जाते. महोत्सवासाठी उत्साहाने काम करणारे कार्यकर्ते, स्पर्धक आणि रसिकांची उपस्थिती

वसई : वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवामुळे येथील वातावरण क्रीडा आणि कलामय होऊन जाते. महोत्सवासाठी उत्साहाने काम करणारे कार्यकर्ते, स्पर्धक आणि रसिकांची उपस्थिती पाहता यावर सुंदर चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांनी वसईत बोलताना केले. २७ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे सोमवारी रात्री उद्घाटन झाले. यावेळी म्हापुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रात्री क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केल्यानंतर ध्वजसंचलनाने महोत्सवाला सुुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी माजी कसोटीपटू विनोद कांबळी, श्रीशांत, अरुण केदार, समीर पाटील, महेश लिमये, मनीष वैष्णवी, प्रशांत मोरे, माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, माजी खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, महापौर प्रवीणा ठाकूर उपस्थित होते. २४ व्या वर्षी कॅरममध्ये जागतिक विजेतेपद पटकावून विक्रम करणाऱ्या प्रशांत मोरे यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची माहिती दिली. खेळाडूने प्रत्येक खेळात चांगले खेळू या विचाराने खेळले पाहिजे. तरच तो खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असे मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, दुपारी चिमाजी अप्पा मैदानात धावणे, भालाफेक, हातोडा फेक, हँडबॉल, कराटे, फुटबॉल, हॉकी, धुर्नविद्या, पोहणे, जिम्नॅसियम, बॉक्सिंग, नेमबाजी या बारा खेळा प्रकाराचा लोगो असलेली मानवी साखळी बनवण्यात आली होती. हा जागतिक विक्रम झाल्याची घोषणा लिम्का वर्ल्ड रेकॉर्डचे आशिया विभाग प्रमुख मनीष वैष्णवी यांनी कार्यक्रमात करून प्रमाणपत्र दिले. रिओ आॅलिंपिकमध्ये ११ हजार ७०० स्पर्धक सहभागी झाले होते. आॅलिंपिक स्पर्धेत सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतात. मात्र, वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवात ५० हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग असल्याने हा जागतिक विक्रम झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे वैष्णवी यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)माजी कसोटीपटू विनोद कांबळी यांनी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. तर श्रीशांत यांनी महोत्सवातून वसईकरांचे प्रेम, सन्मान आणि एकजुटीचे दर्शन झाले असे सांगितले. सध्या आपण हिंंदी आणि तामिळ चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याची माहिती श्रीशांत यांनी दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसईकरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अपंग क्रिकेटपटू कैलाश घाणेकर, कवयित्री डॉ. पल्लवी बनसोडे, चेसपटू अभिषेक ठोंबरे, कराटे प्रशिक्षक बिजू नायर, बेस्ट डान्सर भांडे यांचा सत्कार करण्यात आला.