शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:11 IST

जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटूनही प्रतीक्षा । नागरिकांच्या आरोग्याशी भेसळमाफियांचा खेळ

मंगेश कारळे ।

नालासोपरा : पालघर जिल्हा अस्तित्वात येऊ न सहा वर्षे उलटली तरी जिल्ह्यात अद्याप अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही. ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कारभार देऊन वेळ काढला जातो. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे भेसळमाफियांचे फावले आहे.वसई तालुक्यात भेसळमाफियांची राजधानी बनत चालली आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नसल्याने भेसळमाफिया मोकाट झाले आहेत. पाणी, खवा, चीज, मावा, मिठाई, पनीर, बेकरी प्रॉडक्टमध्ये भेसळ करून नागरिकांना स्लो पॉयझन दिले जात आहे. अनियंत्रित नालासोपारा शहरात अनेक बेकायदा धंदे चालत असतात. या धंद्यांमध्ये भेसळमाफियांची भर पडली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या चाळींत, गोदामांत भेसळयुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यात नकली माव्यापासून मिठाई बनवली जाते. शिवाय, पनीर, तेल, बेकरी प्रॉडक्ट बनवले जातात. मोठ्या हॉटेलमध्ये वापरलेले तेल आणून विविध पदार्थ बनवले जातात. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून अद्याप जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय मिळालेले नाही. २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. तेव्हा खरे तर जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय मिळणे गरजेचे होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पालघर जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने शहरात लक्ष ठेवणे कठीण जाते. पोलिसांकडे तक्र ार केल्यावर पोलीस केवळ छापे टाकतात. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेतल्याशिवाय त्यांना कारवाई करता येत नसल्याने भेसळमाफियांचे फावते आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळमाफिया सक्रिय झाले आहेत. सध्या वसई तालुक्यात दोन प्रकारचे मावे विकले जात आहेत. एक वैधता संपलेला आणि दुसरा सिंथेटिक मावा. त्यांची आवरणे बदलून विक्र ी होत आहे. घाऊक व्यापारी हा मावा ९० ते १२० रु पये किलोने विकत घेतात तर किरकोळ व्यापारी २५० ते ४०० रु पये किलोने विकत घेतात. तर सामान्य ग्राहकाला याच माव्यापासून बनवलेली व मिठाई आणि अन्य स्वरूपात ३५० ते ८०० रु पये किलोने विकतात. हा बनावटी मावा राजस्थान, गुजरात राज्यातून आणला जातो. मावा आणण्यासाठी चक्क प्रवासी बसचा वापर करून नंतर तो साखळी पद्धतीने वितरितकेला जातो.मावा साठवण्यासाठी आणि विक्र ीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवानगी आवश्यक असते. तसेच माव्याची साठवणूक ठराविक तापमानात करावी लागते. कारण तीन दिवसांत हा मावा खराब होतो. भेसळ करणारे हा मावा अडगळीच्या ठिकाणी गोदामात ठेवतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत कोटींचा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे.टाळेबंदीमुळे काम लांबणीवरपालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांसाठी जागा देण्यात आली. आॅगस्टमध्ये उद्घाटन होऊन कार्यालय सुरू होणार होते. मात्र, टाळेबंदीमुळे ते लांबणीवर गेले आहे. आता हे कार्यालय जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग तयार केल्याशिवाय भेसळमाफियांवर अंकुश लावता येणार नाही.पालघर जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे कार्यालय व्हावे, यासाठी अनेक पत्रव्यवहार करून प्रयत्न केले. प्रयत्नामुळे कार्यालयासाठी मान्यताही मिळाली. कार्यालयाला जागा नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही. आॅगस्टमध्ये सुरू होणार होते, पण ते झालेले नाही. तरीही हे कार्यालय लवकरच सुरू होईल.- राजेंद्र गावित, खासदार, पालघर जिल्हा

टॅग्स :palgharपालघर