शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार अजिबात थारा नाही , मुख्यमंत्र्यांनी सुनावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:49 IST

मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.

मीरा रोड : मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देतानाच प्रतिष्ठेच्या केलेल्या मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत ९५ पैकी तब्बल ६१ जागी कमळ फुलले. दरम्यान, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता कानपिचक्या देत काम कसे करावे हे सांगितले.भाजपाची एकहाती सत्ता आल्याने अनेकांनी मनमानी, गैरप्रकार व भ्रष्टाचार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अडीच वर्ष पालिकेत भाजपाच सत्तेवर असून आमदारही भाजपाचाच आहे. परंतु मनमानी, घोटाळे, गैरप्रकार आदींच्या तक्रारी, आरोपांची संख्याही कमी झालेली नाही. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आधी जैन मुनी नयपद्मसागर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले होते. त्या नंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मावळत्या महापौर गीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवरील नागरिकांचा विश्वास तसेच विकास कामांमुळे विजय मिळाल्याचे सांगत पंतप्रधान व पक्षाचे नाव खराब केलेले खपवून घेणार नाही. नागरिकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. पालिकेत पैसे कमावण्यासाठी नव्हे तर नागरिकांच्या सेवेसाठी निवडले आहे याचे भान ठेवा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस