शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर रविवारच्या बाजारावर कारवाई नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 18:25 IST

भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही.

 मीरारोड - भार्इंदर पश्चिमेच्या बेकायदा विस्तारीत रविवार बाजारास महापालिका व सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने कारवाईच केली जात नाही. पालिकेचे अधिकारीच न फिरकल्याने बाऊंसर असुन ही फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही. बेकेयदा बाजारा मुळे वाहतुकीची नेहमीच मोठी कोंडी होऊन चोरटे व उनाडटप्पुंचा सुळसुळाट झाला असताना सत्ताधारी - पालिकेला मात्र फेरीवाले व बाजार वसुली ठेके दाराचे हित जोपासण्यात स्वारस्य असल्याचे स्पष्ट झालंय. दुसरी कडे भार्इंदर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा सुध्दा या गंभीर समस्ये कडे पाहण्यास तयार नाही.भार्इंदर पश्चिमेस पोलीस ठाण्या पासुन देना बँके पर्यंत पुर्वीचा रवीवार आठवडा बाजार भरत असे. पण आता सदरचा बाजार अवास्तव फोफावला असुन थेट शिवसेना गल्ली पर्यंत भरु लागला आहे. भार्इंदर रेल्वे स्थानका का कडे जाणारा तसेच तेथुन अगदी मुर्धा पासुन थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतचा हाच एकमेव रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असल्याने बेस्ट, एसटी, एमबीएमटी सह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची नेहमीच मोठी वाहतुक या मार्गावर असते.शहराचा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची सतत वर्दळ असताना या मार्गावर सर्रास बेकायदा वाहनं पार्क केली जातात. फेरीवाले व हातगाड्या देखील बेधडक लावल्या जातात. या मुळे नेहमीच या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना रवीवारच्या या बेकायदा फेरीवाल्यां मुळे तर प्रवाशांच्या हालात प्रचंड भर पडते. वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.रवीवार बाजार म्हणजे भुरटे चोर, पाकिटमार यांचा सुळसुळाट झाला असुन उनाडटप्पु देखील महिला - मुलींची छेड काढत फिरत असतात. गुन्हेगारी कारवाया वाढत असतानाच दुसरी कडे बाजारात बसणारया फेरीवाल्यां कडुन प्लॅस्टीक, भाज्या आदी अन्य कचरा येथेच टाकला जातो. त्यामुळे साफसफाईसाठी पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागतो.शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सद्या रस्त्याचे काम सुरु असल्याने या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा आणखीनच ताण पडतोय.वास्तविक सत्ताधारी भाजपाने त्यावेळी शिवसेना, बविआ सोबत मिळुन डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत बेकायदा विस्तारीत रवीवार बाजार बंद करण्याचा ठराव केला होता. देना बँक पर्यंतच बाजार बसु द्यावा. स्थानिक सुकी मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बाजारात बसु देण्याचे ठरावात नमुद केले होते. सुरवातीला कारवाईचे नाटक पण नंतर मात्र क्रॉस गार्डन पर्यंत व पुढे थेट शिवसेना गल्ली पर्यंत सर्रास बेकायदा फेरीवाले बसु लागल्याने वाहतुक कोंडी होऊन प्रवाशी व पादचारी नागरीकांना जाच होतोय.दोन वर्ष होऊन देखील ठरावा वर पालिका अधिकारी नियमीत कारवाई करत नसतानाच नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या फेरीवाले हटवण्याच्या आदेशाला देखील पालिकेने केराची टोपली दाखवली आहे.जेवढे फेरीवाले वाढणार तेवढी जास्त बाजार शुल्क वसुली पालिकेने नेमलेल्या बाजार वसुली ठेकेदाराची होते. सदर ठेकेदारास सत्ताधारी व स्थानिक नेतृत्वाचा वरदहस्त असल्याने ठेकेदाराचा फायदा बुडु नये म्हणुन देखील पालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपा या बेकायदा बाजारा विरोधात मुग गिळुन गप्प असल्याचे आरोप केले जातात.त्यातच प्रभाग अधिकारी व पालिका कर्मचारी आज सकाळी रवीवार बाजारात कारवाईची कल्पना असुन देखील कुठे दिसले नाहित. दुसरी कडे पालिकेचे ठेक्याने घेतलेले बाऊंसर व पालिकेचा टॅम्पो मात्र फेरया मारत होता. पण कारवाई मात्र केली जात नव्हती. पालिका अधिकारयांचे खिसे भरले असुन त्या मुळे ते कारवाई करणार नसल्याचे आरोप काहींनी केले. तर या प्रकरणी विभागप्रमुख संजय दोंदे व प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांच्याशी संपर्क साधला असता गुळमुळीत उत्तरं देउन फेरीवाल्यांवर कारवाई मात्र केलीच गेली नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक