शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर वसई - विरार महापालिका आम्ही विसर्जित करू - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 07:07 IST

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत ९,००० बेकायदा बांधकामे असल्याचे समजताच उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. २०११मध्ये स्थापित केलेली वसई - विरार पालिका अन्य पालिकांच्या तुलनेने नवी आहे.

मुंबई : वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत ९,००० बेकायदा बांधकामे असल्याचे समजताच उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. २०११मध्ये स्थापित केलेली वसई - विरार पालिका अन्य पालिकांच्या तुलनेने नवी आहे. तरीही नऊ वर्षात ९००० बेकायदेशीर बांधकामे? इतक्या झपाट्याने विनापरवानगी बेकायदा इमारती उभ्या राहात असतील तर पालिकेचा फायदा काय? निवडणूक हव्या कशाला? राज्य सरकारलाच प्रशासकामार्फत पालिकेचा कारभार सांभाळायला सांगू, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावले.वसई - विरार पालिका क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामांमुळे पाणी साचते. पूरस्थिती निर्माण होते. पाण्याचा निचरा होत नाही. शासनाच्या राखीव भूखंडांवरही अतिक्रमण सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी टेरेन्स हॅन्ड्रिक्स यांनी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, कोरोना संकटामुळे वसई - विरार पालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या या पालिकेचा कारभार प्रशासक सांभाळत असल्याचे न्यायालयाला सांगितले.त्यावेळी त्यांनी पालिकेच्या हद्दीत नऊ हजार अवैध बांधकामे असल्याचे न्यायालयाला सांगितले. हे ऐकताच न्यायालयाने संताप व्यक्त केला.आम्ही वसई - विरार पालिका विसर्जित करू. निवडणूक हव्या तरी कशाला? पालिका नागरिकांचे आयुष्य सुकर करण्यासाठी असतात. त्यांना त्रास देण्यासाठी नाही. नागरिकांत दोन गट आहेत. एक बेकायदा कामे करणारा आणि दुसरा कायद्याचे पालन करणारा. त्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्यांना त्रास व्हायला नको,'' असे न्यायालयाने म्हटले. वसई -विरार पालिकेच्या प्रशासकांना या बेकायदा बांधकामांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याची पावले उचलावीत आणि कशी कारवाई करणार, याबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश न्यायालयाने पालिकेच्या प्रशासकांना दिले

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट