शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून तरुणाचे हात छाटले; दोन पथकांसह १०० पोलिसांची शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 07:27 IST

सुशील रिक्षाने घरी जात असताना धुमाळ याने गाडी रिक्षाला आडवी केली आणि त्याला बाहेर खेचत हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : देवपे येथे सुशील अजय भोईर (२७) यांचे पूर्व वैमनस्यातून माजी सभापती श्रीकांत धुमाळ यासह इतरांनी दोन्ही हात छाटल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. 

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी जनार्दन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दोन पथके तयार केली. सुशील भोईर आणि माजी सभापती श्रीकांत धुमाळ यासह इतर तरुणांमध्ये पूर्व वैमनस्य होते. सुशील रिक्षाने घरी जात असताना धुमाळ याने गाडी रिक्षाला आडवी केली आणि त्याला बाहेर खेचत हल्ला केला.

पोलिसांकडून शोधधुमाळ याच्यासह अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतरांवर गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. फरार आरोपींचा सुमारे १०० पोलिस शोध घेत आहेत. 

कंपन्यांची झाडाझडतीफरार आरोपी लपण्यासाठी मुरबाडमधील बंद कंपन्यांचा आधार घेत असावेत, यासाठी सुमारे १९६ कंपन्यांची झाडाझडती घेतली. आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी