शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीनेच दिली पतीच्या हत्येसाठी एक लाखांची सुपारी; आरोपींना पोलिसांनी ४८ तासात केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 18:33 IST

 पत्नीनेच पतीच्या हत्येची १ लाखांची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) - पत्नीनेच पतीच्या हत्येची १ लाखांची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पण ही नेमकी हत्या कोणत्या कारणांमुळे व का झाली याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. सदर हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची चर्चा असल्याने पोलीस त्याच दृष्टीने तपास करत आहे. 

२७ जानेवारीला संध्याकाळी नायगाव रिक्षा स्टँड जवळील ब्रिजखाली खाडीच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. वालीव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केल्यावर मृत व्यक्तीची धारदार हत्याराने मानेवर व डोक्यावर वार करून हत्या करत मृतदेह त्या ठिकाणी टाकला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. रविवारी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

खुनाचा गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीच्या पाण्यात फेकुन दिल्याने फुगलेल्या, कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताची ओळख पटविणे. आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी वेगवेगळी पाच पथके तयार केली. पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील मनुष्य मिसींग रजिस्टर चेक केले. त्यादरम्यान काहीही माहिती प्राप्त न झाल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या पोलीस ठाण्यातील मनुष्य मिसिंग रजिस्टर चेक केले. यातील मयताने अंगावर परिधान केलेल्या कपडयांचे वर्णन मुंबईतील बांगुरनगर पोलीस ठाण्यात मनुष्य मिसींग व्यक्तीच्या कपडयाशी जुळले. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेवुन त्याचे नाव कमरुददीन मोहम्मद उस्मान अन्सारी (३५) हे असल्याचे निष्पन्न केले.     गोरेगाव येथे राहणाऱ्या कमरुद्दीन रहात असलेल्या परिसरात जावून चौकशी केली. शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला पठाण (४०), त्याची पत्नी सौफिया पठाण (२८) हे घटना घडल्यापासुन परिसरातुन निघून गेल्याची माहिती मिळाली. ते गुजरातच्या वापी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांना त्या ठिकाणावरुन ताब्यात घेऊन विश्वासात त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच पतीच्या हत्येसाठी प्रेरणा देणारी त्याची पत्नी आशिया अन्सारी हिला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी