शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मेट्रो कारशेड आरक्षणाची सुनावणी भाईंदरमध्येच होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2023 20:36 IST

ह्या ठिकाणी मेट्रो कारशेडला ह्या भागातील एका संघटने मार्फत विरोध करण्यात आला आहे . तशी निवेदने देण्यात आली आहेत .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या मोरवा, राई - मुर्धा दरम्यानच्या ३२ हेक्टर जागेवर मेट्रो कारशेडचे आरक्षण प्रस्तावित केल्या प्रकरणी आलेल्या हरकती - सूचनांवर सुनावणी हि कोकण भवन ऐवजी भाईंदर मध्ये होणार आहे . ३०  जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी सुनावणी चालणार आहे . 

मीरा भाईंदर साठीच्या मेट्रो ९ तसेच मेट्रो ७ अ मार्गाच्या कारशेड साठी मोरवा, राई व मुर्धा दरम्यानच्या ३२ हेक्टर मोकळ्या खाजगी जमिनीवर शासनाच्या नगरविकास विभागाने आरक्षण टाकले आहे .  शासनाने मेट्रो कारडेपो साठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार तशी सूचना सप्टेंबर २०२२ मध्ये प्रसिध्द केलेली आहे. 

वास्तविक ह्या ठिकाणी मेट्रो कारशेडला ह्या भागातील एका संघटने मार्फत विरोध करण्यात आला आहे . तशी निवेदने देण्यात आली आहेत . आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मेट्रो कारशेड विरोधात भूमिका घेत सदर कारशेड उत्तन भागातील सरकारी जमिनीवर उभारण्याची मागणी चालवली आहे . 

दरम्यान सदर जमीन मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्या बाबत शासनाने सूचना प्रसिद्ध केल्या नंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या .  विहीत मुदतीत १ हजार १७६ हरकती वा सुचना दाखल झालेल्या आहेत.  महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार हरकती वा सूचना देणाऱ्यांना सुनावणी देणे आवश्यक आहे . 

मोरवा , राई व मुर्धा गावातून मोठ्या प्रमाणात हरकती असल्याने त्याची सुनावणी नवी मुंबईच्या कोकण भवन येथे ठेवल्यास नागरिकांना येण्या जाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार होता . या बाबत आ . सरनाईक यांनी दूरध्वनी द्वारे नगररचना कोकण विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याशी संपर्क साधून सुनावणी भाईंदर मध्येच घेण्याची मागणी केली होती . 

त्या अनुषंगाने आता मेट्रो कारशेडची सुनावणी हि  कोकण भवन येथे न ठेवता मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहात ठेवण्यात आली आहे . ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी हि सुनावणी होणार आहे . सुनावणीसाठी पालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMetroमेट्रो