शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने 

By धीरज परब | Updated: March 8, 2023 11:20 IST

स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरारोड - भाईंदर पूर्वेला नवघर मार्ग,  स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवजयंती साजरी करण्या वरून शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट आमने - सामने आले आहेत. ठाकरे गटाच्या अर्जावर पोलिसांनी परवानगी दिल्या नंतर त्यास शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिवजयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला आहे . पक्ष, कार्यालये व शाखांवर ताबा घेण्याचे भांडण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्यंत पोहचले आहे.

स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. पूर्वीपासून शिवजयंती साजरी करताना नवघर पोलिसांना पत्र दिले जायचे. यंदा १० मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा संघटक जयलक्ष्मी सावंत व उपशहर प्रमुख राजाराम सावंत यांनी नवघर पोलिस, महापालिका, वाहतूक पोलीस आदींना अर्ज दिले होते.

त्यानुसार सावंत यांना शिवजयंती साजरी करण्यासाठी नवघर पोलिसांनी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ४ मार्च रोजी पालिकेच्या प्रभाग अधिकारी यांना  परवानगी देण्या बद्दल नाहरकत पत्र दिले होते .  वाहतूक पोलीस व नवघर पोलिसांनी शिवजयंती साजरी करण्यास नाहरकत दिल्याने सोमवारी सावंत हे प्रभाग समिती कार्यालयात पालिकेच्या परवानगी शुल्कची पावती फाडण्यास गेले असता त्यांना शुल्क भरण्याची पावती देण्यास व परवानगी देण्यास नकार देण्यात आला. 

त्याच परिसरातील शिवसेनेत असलेले विभागप्रमुख संतोष धामणकर हे शिंदे गटात असून त्यांनी , गेलीत वर्षी सदर जागी आपण शिवजयंती केल्याने आपणास परवानगी देण्याची मागणी करत ठाकरे गटाच्या शिवजयंतीला जागा देण्यास विरोध केला . 

परवानगी थांबल्याने ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटक जयलक्ष्मी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे . पूर्वी पासून शिवसैनिक येथे शिवजयंती साजरी करत आहेत . यंदा सुद्धा आम्ही आधी रीतसर अर्ज केल्यावर पोलिसांनी आम्हाला नाहरकत दिली असताना अचानक सत्तेच्या दबावाखाली शिवजयंतीला विरोध करून आमची पालिकेची परवानगी अडवण्यात आली असे सावंत म्हणाल्या . 

गेल्यावर्षी धामणकर यांना शिवजयंतीची परवानगी मिळाली असल्याने यंदा सुद्धा त्यांना परवानगी दिली पाहिजे असे शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश वेतोस्कर यांनी सांगितले . तर नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे .  दोन्ही गटाने शिवजयंती वरून वाद घालू नये यासाठी थोड्या फार अंतराने दोन्ही गटाने शिवजयंती साजरी करून वाद संपुष्टात आणावा असे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत . 

दहीहंडीवरून देखील झाला होता वाद सदर स्नेहा गल्ली नाक्यावर अनेक वर्षां पासून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे हे दहीहंडीचे आयोजन करतात . गेल्यावर्षी ठाकरे गटाचे नलावडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले  माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर शिंदे गटात गेल्यावर त्यांनी देखील त्याच जागी दहीहंडीची परवानगी मागितली होती . त्यावेळी पोलिसांनी नलावडे यांना त्याच जागी तर वेतोस्कर यांना काही अंतरावर दहीहंडी लावण्यास परवानगी देऊन वाद मिटवला होता .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना