वसई पूर्वेच्या औदयोगिक वसाहतीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन प्लास्टीक कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झालेली नसली तरी दिड कोटी रूपयांच्या मालत्तेचे नुकसान झाले आहे. वसईच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत आहे. तेथील व्हिक्टोरी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्लास्टिक बनविणाऱ्या कंपनीला गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. गाळा क्रमांक ५ व ६ या कारखान्याला आगीने वेढले. प्लास्टिक असल्याने आगीने लगेच पेट घेतला. ही आग बाजूला असलेल्या श्रीजी व पूर्णिमा प्लास्टिक या दोन कंपन्यांनात पसरली. आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की काही क्षणातच तिन्ही कंपन्या भस्मसात झाल्या. आगीची माहिती मिळताच वसई - विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे एकूण ५ बंब मागवण्यात आले होते. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. आगीचे रौद्र रूप पाहता मीरा भार्इंदरच्या अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच आयुक्त सतीश लोखंडे, अग्निशमन दल प्रमुख भरत गुप्ता मोटारसायकलवरून घटनास्थळी पोचले.
वसईतील प्लास्टिक कंपन्यांना भीषण आग
By admin | Updated: April 2, 2016 02:58 IST