शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 19:54 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची  प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

हितेंन नाईक -

पालघर- तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी स्टाफ नर्सकडून (पुरुष) चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशानंतर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची  प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.

ज्या अर्थी हा कर्मचारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता, त्या अर्थी यापूर्वीही त्याने असे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट होते. तसेच, संबंधित  वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मूक संमती शिवाय हे शक्य नसल्याने त्यांच्यावरील कारवाईचे काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या एका १३वर्षीय मुलीवर उपचार करण्यासाठी त्या केंद्रातील डॉक्टरांना बोलवण्या ऐवजी तेथे नियुक्त. संबंधित स्टाफ नर्स (पुरुष) या पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या मुलीवर उपचार सुरू करीत इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. ह्यावर त्या मुलीच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर, या कर्मचाऱ्याने त्यांनाच उलट सुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. हो मी दारू प्यायलोय, असेही तो म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या समोरच हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. नातेवाईकांनी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून हा प्रकार समोर आल्यानंतर प्रसार माध्यमांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणा हलली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,आरोग्य सभापती संदेश ढोणे ह्यांनी ह्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ह्यांनी कंत्राटी कामगार राकेश आढाव ह्याची सेवासमाप्ती करण्याचे लेखी आदेश  काढले.

परंतु कर्मचारी रुग्णावर उपचार करीत असताना तिथे संबंधित वैद्यकीय अधिकारी ही उपस्थित असल्याने त्यांच्या मुक संमती शिवाय हे शक्य नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. असे उपचार यापूर्वीही अनेक वेळा घडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा प्रकारे मद्यपान करणारे आणि कामचुकार कर्मचारी आढळल्यास तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.

टॅग्स :palgharपालघरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल