शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना मोबाइल देताना घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:52 IST

आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे.

वसई : आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल देताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.नागोरी कुटुंबातील हुजेफा अजगर अली नागोरी (वय १३) याने मंगळवारी रात्री उद्यानातील झोक्याच्या रॉडला नायलॉनच्या दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे, आत्महत्या म्हणजे काय, ती गळफासाने कशी करतात? याची माहिती इंटरनेटवरून कुतूहलापोटी मिळविली आणि तिचा प्रयोग करून पाहात असताना, त्याच्या हातून त्याची आत्महत्या खरोखरच घडली.रश्मी रेसिडन्सी येथे १५ जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. हुजेफा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो सेठ विद्यामंदिरात आठव्या इयत्तेत शिकत होता. या प्रकाराची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलीस तपासात हुजेफाच्या दप्तरात त्याच्या मृत्यूबद्दल काही संशयास्पद धागेदोरे मिळाले आहेत. हुजेफाने वहीत काही आकृत्या काढल्या असून, लिखाणही केले आहे. आत्महत्येची वेळ व ठिकाण त्याने त्यात लिहिलेले आहे. त्याचा या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. पंख्याला दोरी बांधलेले चित्र, तसेच आत्महत्या केलेल्या ठिकाणाची नोंद त्याने वहीत केलेली होती. इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडीओ तो पाहायचा. त्याचा परिणाम त्याच्या बालमनावर झाला असावा.हुजेफाच्या आत्महत्येने इंटरनेटचे दुष्परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मैदानी खेळ सोडून मुले आभासी विश्वात रमत आहेत. त्याचाच परिणाम मोठ्या प्रमाणात लहानग्यांच्या मानसिक स्वास्थावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.