शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सूर्या प्रादेशिक पाणी योजनेचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:06 IST

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सर्व नियम धाब्यावर बसून पुन्हा सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या कामाला हलोली येथे सुरवात केली मात्र तेथील सरपंच ,सदस्य व शेतकऱ्यांनी काम बंद पाडले.

मनोर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सर्व नियम धाब्यावर बसून पुन्हा सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या कामाला हलोली येथे सुरवात केली मात्र तेथील सरपंच ,सदस्य व शेतकऱ्यांनी काम बंद पाडले.एम एम आर डी ए व एलएनटी यांनी कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले होते. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस पालघर जिल्हातील ग्रामीण भागातील स्थानिक शेतकºयांचा तीव्र विरोध आहे पावसाळ्या आधी मेंढवण , वाडे खडकोना, चिल्हार , नांदगाव येथे कामाला सुरवात केली होती परंतु त्या वेळी सूर्या पाणी बचाव समितीने जिल्हा बंद बेमुदत उपोषण करून ते काम बंद पाडले ते काम तिथे न करिता चार महिन्या नंतर पुन्हा हलोली बोट हद्दीत सुरू केले स्थानिक शेतकºयांनी आक्षेप घेतले तरी काम सुरू होते शेवटी तेथील सरपंच समृद्धी सांबरे उपसरपंच अजय पाटील, सुवर्णा सातवी, पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील ,धनेश पाटील,दीपक पाटील सह संतप्त शेतकºयांनी काम बंद पाडले. वसई विरार , मीरा भार्इंदर महानगरपालिका व २७ गावांसाठी एम एम आर डी ए ४०३ एम एल डी क्षमतेची सुमारे १३०० कोटी खर्चाची सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठायोजना राबवत आहे आपल्याहक्काचे, सिंचनाचे पाणी शहरी भागात देण्यात येत आहे ते पाणी जोपर्यंत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना मिळत नाही तोपर्यंत या योजनेचे काम सुरू होऊ देणार नाही असे सूर्या पाणी बचाव समितीचे रमाकांत पाटील यांनी लोकमत ला सांगितले.परवानगीविना काम सुरू केलेच कसे?वनविभाग ने त्यांच्या जमिनीत खोदकाम करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही तसेच सूर्या प्रकल्पाने ही परवानगी दिलेली नाही तरी सुद्धा एम एम आर डीए व एल अ‍ॅन्ड टी च्या ठेकेदाराने कामाला सुरुवात कशी केली असा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एम एम आर डी ए आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी शेतकºयाचे व ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये, अशी भूमिका हलोलीच्या सरपंच समृद्धी सांबरे यांनी मांडली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार