चिमुकल्या मैत्रिणीचा वाचवला जीव; जि.प. उपाध्यक्षांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:50 PM2020-02-23T23:50:00+5:302020-02-23T23:50:07+5:30

राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्याची मागणी

Survived by a splinter girlfriend | चिमुकल्या मैत्रिणीचा वाचवला जीव; जि.प. उपाध्यक्षांकडून सत्कार

चिमुकल्या मैत्रिणीचा वाचवला जीव; जि.प. उपाध्यक्षांकडून सत्कार

Next

विक्रमगड : विहीरीत पडलेल्या चिमुकल्या जागृतीचा जीव वाचवताना संजनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ या सर्वांनी तिचे कौतुक केले. शासनाने देखील तिच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक करून तिला सन्मानित करावे अशी मागणी मंजुळा निचिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी जागृतीचा जीव वाचवणाऱ्या संजना आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा सत्कार केला. संजना तसेच जागृतीचा आर्थिक स्वरूपात बक्षीस देऊन गौरव केला.

मंगळवार, १८ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सायंकाळी विक्रमगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक केंद्रशाळा कर्हेतलावली या शाळेत आठवीत शिकणारी संजना जेठू राव पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेली. विहीरीच्या कठड्यावर हंडा ठेवून तिने विहिरीतून पाणी काढले. तेवढ्यात तिसरीमध्ये शिकणारी जागृती विष्णू राव ही देखील कळशी घेऊन पाणी भरु लागली. संजना डोक्यावर हंडा ठेवून जाणार तेवढ्यात जागृतीचा पाय घसरला आणि ती विहीरीत पडली.

संजनाने लगेचच डोक्यावरील हंडा खाली ठेवला, आणि मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागली. जवळपास कोणीच नसल्याने आपणच काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर तिने जोरात ओरडून जागृतीला हातपाय हलवण्यास सांगितले. जागृतीही पोहत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. संजनाने स्वत: विहीरीत उतरायचे ठरवले. विहीरीला पायºया नव्हत्या, विहीर बांधत असताना चढण्या उतरण्यासाठी काही दगड सोडलेले होते, त्याचाच आधार घेऊन ती विहिरीत उतरली. तोवर जागृतीने कमालीचे धैर्य दाखवले. सतत दगडाकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. अखेरीस संजना उभी असलेल्या दगडापर्यंत पोहोचण्यात ती यशस्वी झाली. आता पुढचं कठीण काम होतं ते जागृतीला घेऊन वर येणं. कारण दोन दगडांमध्ये अंतर खूप होतं. जागृतीला विहिरीबाहेर कसं आणलं, असं विचारलं तेव्हा ती म्हणाली की, जागृतीला खांद्यावर घेऊन तिला वर ढकलत मी एकेक दगड चढत वर आले. प्रसंगावधान दाखवत लगेच खांद्यावर घेऊन धावत जवळच असलेला सरकारी दवाखाना गाठला.

दवाखान्यातील संपूर्ण स्टाफकडून कौतुक
जागृती विहीरीत पडल्यापासून दवाखान्यात आणेपर्यंत सर्व परिस्थिती संजनाने एकटीने हाताळली. संयमाने व तेवढ्याच धाडसाने संजनाने दाखवलेले प्रसंगावधान कौतुकास्पद आहे. दुसºया दिवशी दवाखान्यातील
संपूर्ण स्टाफने शाळेत येऊन तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. संजनाने दाखवलेल्या या धाडसा बद्दल केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी तिचे भरभरून कौतुक केले.

Web Title: Survived by a splinter girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.