शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सफाई न केल्याने सूर्या कालव्याची कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:07 IST

आठवडाभर उशिरा पाणीपुरवठा; दुर्लक्षामुळे सूर्या कालवे रुतले गाळात

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू, पालघर तालुक्यातील गावातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या कालव्यात साठलेला गाळ, दगड - गोटे, गवत, झाडेझुडपे यामुळे कालव्याची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. पाच वर्षांत कालव्यांची साफसफाई न केल्याने अशी परिस्थिती झाली आहे. त्यातही सोमवार, ३० डिसेंबर रोजी उशिरा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरला सूर्या कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र चालू वर्षी तब्बल पंधरा दिवस उशिरा डाव्या कालव्यातून ३० डिसेंबरला पाणी सोडण्यात आले आहे तर उजव्या कालव्यातून ते ३१ डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम लांबणीवर जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य कालव्यात तसेच उपकालव्यात गाळ, कचरा, गवत, दगडगोटे साचले आहेत. तरीही त्याची सफाई न करता पाणी सोडले आहे. आधीच कालव्याचे प्लास्टर, बांधकाम वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा निचरा होत असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो आणि पाणी सोडल्यानंतर आठवडाभरात पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचते. मात्र, आता तर कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे आणि दुरवस्था झाली आहे.दरम्यान, २००९ पासून कालवे दुरुस्ती आणि साफसफाई करण्यास मंजुरी दिली जात नाही तसेच ती हातीही घेतली जात नाही. त्यामुळे गाळ काढण्याची तसेच साफसफाईची कामे यांत्रिकी विभागामार्फत केली जात असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड आदी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये डहाणूतील पेठ, तवा, धामटने, कोल्हान, कासा, सूर्यनगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, सारणी, म्हसाड, आंबिवली, साये, आंबिस्ते, सोनाळे, वाघाडी, ऐना, साखरे तर पालघरमधील बºहाणपूर, आंबेदा, नानीवली, चिंचारे, बोरशेती, अकेगव्हान, रावते, कुकडे, महागाव आदी सुमारे ७० ते ८० गावांना पाणीपुरवठा केला जातो.निवडणूक प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेल्याने कालव्यातून उशिरा पाणीपुरवठा झाला असून डाव्या कालव्यातून पाणी सोडले असून ३१ डिसेंबरला उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.- प्रवीण भुसारे, उपअभियंता,सूर्या प्रकल्प वाणगाव शाखासूर्या कालव्याची मशिनरीने गाळ काढण्याची कामे सुरू असून बाकी गाळ काढण्याची कामेही केली जातील.- रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प