शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय सुट्यांतील अचानक बदलाने शिक्षकांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 02:45 IST

पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक

- सुरेश काटेतलासरी - पालघर जिल्हा परिषदेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरीता सुट्टीच्या यादीला मान्यता दिलेली असतांना अचानक गणपतीच्या १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या अगोदरच जाहीर केलेल्या सुट्टीत ११ सप्टेंबरला अचानक बदल करून त्या १२ ते १७ सप्टेंबर अशा केल्याने गौरी गणपतीच्या सणाला गावी जाणार्या शिक्षकांची मात्र चांगलीच गोची झाली.आधीच्या सुट्टयांप्रमाणे सर्वांनी जाण्याचे व परतीचेही रेल्वे, बसची आरक्षणे अगोदरच करून ठेवली होती. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी गावी जाणे रद्द केले तर जे गेले त्यांनी अक्षरश: महिला व लहान लहान मुलांसह जीवघेण्या गर्दीतून त्रास सहन करत परतीचा मार्ग धरला. सलग सुट्टी दिल्याने कुटुंबीयां सोबत काही वेळ घालविता येणार अशा आनंदात असलेल्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले.यापुढे जिल्हा परिषद प्रशासनाने सण, उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांमध्ये बदल करतांना तो अचानक न करता किमान आठवडाभर तरी आधी करावा जेणेकरून तो सर्वसमावेशक राहिल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या सुटटयांमध्ये बदल का केला? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील चलो जीते हैं हा लघुपट दाखविण्यासाठी हा बदल केल्याची चर्चा आहे. तसे असेल तर हा लघुपट १८ ऐवजी २१ लाही दाखवता आला असता. अनेक जिल्हा परिषदांनी तो लघुपट गणपती सुट्टीनंतर दाखविला आहे. मग येथेच हा अट्टाहास कशासाठी? जाहीर केलेल्या सुट्टीत बदल करून सर्व शिक्षकांची धावपळ उडविणे योग्य नाही,अशी भावना आहे.जीते है नही, ‘मरते है।’इतरवेळी छाती काढून कार्यालयात ठाण मांडून असणारे शिक्षकांचे तथाकथित कैवारी अशा वेळी मात्र कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जीवघेणा परतीचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी परतावे लागल्याने चलो मरते है हा अनुभव शिक्षकांच्या वाट्याला आला.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण