शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

अशी होणार नवपालघरची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:38 IST

पालघर या नव्या जिल्हयाची निर्मिती करण्याचा स्थापन करण्याचा निर्णय १, आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्याची जबाबदारी शहर आणि

पंकज राऊतबोईसर : पालघर या नव्या जिल्हयाची निर्मिती करण्याचा स्थापन करण्याचा निर्णय १, आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्याची जबाबदारी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळावर सोपविली पालघर नवीन शहर प्रकल्पामध्ये, पालघर, कोळगाव, मोरकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोडे आणि शिरगाव या सात महसूली गावाचा समावेश असेल.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण विकसित करण्यामध्ये जिल्हा पातळीवरील विविध कार्यालयांसाठीच्या इमारती तसेच आवश्यक पायाभूत सुविधांंचा समावेश असून ही जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालया अंतर्गत पालघर येथे सिडकोतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, अतिथीगृह, जिल्हा परिषद कार्यालय, कर्मचाºयांसाठी निवासस्थाने तर नवीन प्रशासकीय इमारती (ब्लॉक - ए आणि बी) रस्ते, पदपथ, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत पुरवठा इ. पायाभूत सुविधा बरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभारण्यात येणार आहे.पालघर जिल्हा मुख्यालय १०३.५७ हेक्टर क्षेत्रफळात ३ वर्षात वसविण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पालघर - बोईसर राज्य महामार्गालगत असलेल्या सेक्टर - १५ कोळगाव - पालघर येथे वसविण्यात येणार असल्यामुळे येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर पडेल. केवळ प्रशस्त जागा हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असून जिल्हा मुख्यालयाचे हे ठिकाण येथील रहिवाशांना येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीचे असणार आहे. त्यामुळे त्यांची सरकारी कार्यालयाशी संबंधित कामे जलद गतीने पार पडण्यास मदत होईल. उत्कृष्ट सार्वजनिक पायाभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शासकीय सेवा देणारे केंद्र म्हणून हे ठिकाण महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.या प्रकल्पात वायुविजनास ( हवेशीर) अनुकूल अशा पद्धतीने बांधलेली आवारे, स्वागतकक्ष आणि मार्ग, स्थानिक आणि आधुनिक स्थापत्यशैलीचा संगम असलेले आकर्षक बांधकाम उर्जासंपन्न भव्य स्थापत्यशास्त्राचा वापर, सभोवतालच्या भव्य परिसरात सुसंगत असे विरूध्द दिशेने केलेले बांधकाम सर्व इमारती भोवती असलेली हरित स्थाने, लोकांना सहजपणे ये- जा करता यावी म्हणून प्रशस्त पदपथ, कडक उन्हाला अटकाव करण्यासाठी इमारतीवर डोम पध्दतीने छताची रचना, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याचा पुनर्वापर यासाठी आधुनिक प्रांगणात नैसर्गिक जलस्त्रोत रोखण्यासाठी उभारण्यात आलेला जलप्रकल्प इमारतीच्या दर्शनी भागांमध्ये पराविर्तत होणाºया जीआरसीचा वापर ऊर्जाक्षम स्वयंचलित दिव्यांचा वापर एचव्हीएसी, विद्युत आणि पाणी सुविधांसाठी ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर नैसर्गिक प्रकाशाचे अधिकाधिक परावर्तन व्हावे यासाठी भव्य फ्लोअर प्लेटसचा वापर ही ठळक वैशिष्ट्ये असणार आहेत.प्रशस्त इमारती अन् हिरवेगार वातावरण हेच आकर्षणबांधकामाच्या क्षेत्रफळा नुसार तळ मजला २ आरसीसीचे बांधकाम (अजून दोन मजल्याची भविष्यकालीन तरतूद ) भूखंडाचे क्षेत्रफळ : १८६८५८.५१ चौ. मी. एकूण बिल्ट अप क्षेत्र : ६६०५६.०८ चौ. मी.अ) जिल्हाधिकारी कार्यालय इमारत : १५४८१.३९ चौ.मी.ब) जिल्हा परिषद कार्यालय इमारत : १५४८१.३९ चौ. मीक) पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत : ३९०२.०२ चौ. मी.ड) नवीन प्रशासकीय कार्यालय ब्लॉक - ए :१५७०९.८९ चौ.मी. इ) नवीन प्रशासकीय कार्यालय ब्लॉक - बी : १५४८१.३९ चौ. मी.अनुज्ञेय चटई निर्देशांक क्षेत्र : १ उपभोग्य चटई निर्देशांक क्षेत्र : ०.३९, एकूण खुले क्षेत्र : १६४७३५.६२ चौ. मी., प्रस्तावित हरित क्षेत्र : ७०७२९. ०८ चौ. मी. चा समावेश आहे. वाहनतळा मध्ये ७५४ कार २९६८ स्कूटर/मोटार सायकल तर २९८५ सायकल पार्किंगची व्यवस्था असून प्रकल्पाची किंमत (इमारती) : रु . १५०. ५८ कोटी.बांधकामाचा दर : रु . २११८.५६ प्रती चौ. फूट असणार आहे या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रीय आराखडे आणि अभियांत्रिकी कामे पालघर नवीन शहरे विकास प्राधिकरण सिडको व तिच्या सहकंपन्या पार पाडतील.