शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

लॉकडाऊन काळातील यश; मनरेगातून फळबाग लागवडीमध्ये डहाणू राज्यात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 01:33 IST

शासनाच्या कृषी विभागांतर्गत पालघर जिल्ह्याच्या डहाणू कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली जाते.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : पालघर जिल्हा कृषी विभागासह डहाणू तालुका कार्यालयाने अथक परिश्रम करून मानाचा तुरा रोवला आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२०-२१ वर्षात डहाणूने १७३५ शेतकऱ्यांना ९२९ हेक्टर लागवडीचा लाभ देऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांनी लॉकडाऊनकाळात हे यश प्राप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

शासनाच्या कृषी विभागांतर्गत पालघर जिल्ह्याच्या डहाणू कार्यालयाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली जाते. उत्तर कोकणातील हा भाग बागायतीकरिता प्रसिद्ध असल्याने नागरिकांचा फळलागवडीकडे वाढता कल आहे. त्यामुळे मनरेगा योजनेतून फळलागवडीचा उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविण्याच्या कार्यात अधिकाऱ्यांपासून कृषीसेवकांनी कंबर कसली. या पथदर्शी योजनेत आदिवासी शेतकरी मुख्य लक्ष्य असल्याने त्यांना २३,०८६ काजू कलमे, २८,०५२ आंबा कलमे, ३,४०५ चिकू, १,०९० नारळ, १,३४० शेवगा व २७० अन्य फळझाडे असे एकूण ५७,२३४ कलमी रोपे या योजनेतून निःशुल्क वाटप करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात काजू कलमांची उपलब्धता कमी असल्याने २३,०८६ इतकी कलमे थेट रत्नागिरीतील शासकीय रोपवाटिकेतून खरेदी करण्यात आली. ही कलमे थेट मालवाहू एसटीने शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आली. डहाणू तालुक्याला ९०० हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक देण्यात आला होता. परंतु, लक्ष्यांकाहून जास्त लागवड करून तालुक्याने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली.

या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ८६,४८८ रुपये इतकी मजुरी व सामग्रीचे अनुदान, दुसऱ्या वर्षी ३७,३३४ रु. तर तिसऱ्या वर्षी ३६,८३८ रु. याप्रमाणे तीन वर्षांत अनुदान आणि ५९८ दिवस रोजगार मिळणार असल्याचे मार्गदर्शन मंडळ अधिकारी सुनील बोरसे यांनी केले.- प्रकाश सोनजी महाले,  लाभार्थी, ब्राह्मणवाडी