शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र घटना! ऐन लग्न घटकेच्या वेळी एक नवरी लिफ्टमध्ये तर दुसरी फ्लॅटमध्ये अडकली, पुढे जे घडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:48 IST

या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी विचित्र योगायोग असल्याचे बोलले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेस ऐन लग्न घटिके वेळी एक नवरी लिफ्टमध्ये तर एक नवरी फ्लॅटमध्ये अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी विचित्र योगायोग असल्याचे बोलले जात आहे.

भाईंदर पश्चिमेस विनायक नगर येथील महापालिकेच्या सभागृहात सोमवारी रात्री लग्न होते . लग्नाचा मुहूर्त जवळ आला असतानाच नवरी मुलगी लिफ्ट मध्ये अडकल्याचे समजल्याने एकच धावपळ उडाली. प्रिती वाघेला हि २२ वर्षीय नवरी वैशाली शाह, निकिता वाघेला, विजया शाह सह कियान शाह व प्रथम शिंदे या दोन लहान बालकांना घेऊन लिफ्ट मधून पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्ट बंद पडल्याने अडकून पडल्या होत्या. 

यावेळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले . परंतु वाहतूक कोंडी मुळे अग्निशमन दलास घटनास्थळी येण्यास विलंब झाला. परंतु अग्निशमन दलाचे जवान आल्या नंतर त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुमारे २० मिनिटांच्या अथक प्रयत्न नंतर सुटका केली. लिफ्ट खाली आल्यावर ती उघडताच आतून नवरीसह सर्व बाहेर आले. लिफ्टमध्ये अडकल्याने श्वास घेण्यास झालेली अडचण व भीती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यापैकी निकिता यांना जास्त त्रास झाल्याने नजीकच्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, नवरी मुलगी सुखरूप बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि नंतर ठरल्या मुहूर्तावर शुभमंगल पार पडले. 

दुसरी घटना भाईंदरच्या राई गावात घडली . सोमवारी सायंकाळी गावातील अमोल पाटील याचे मुंबईत राहणाऱ्या तेजस्वी सोबत राई मैदानात लग्न होते . नवरी मुलगी शेजारी असणाऱ्या वालचंद प्लाझा इमारतीतल्या एका सदनिकेत थांबली होती . मात्र  दाराचे लॉक उघडत नसल्याने नवरी आत अडकून पडली . त्याच इमारतीत राहणारे अग्निशमन दलातील अधिकारी जगदीश पाटील यांनी अग्निशमन दलास पाचारण केले . जवानांनी कटावणीच्या सहाय्याने लॉक तोडून नवरी मुलीला बाहेर काढले . सायंकाळचा ठरलेला मुहूर्त टळून गेल्याने नंतरच्या पुढील शुभ मुहूर्तावर शुभमंगल करण्यात आले

टॅग्स :marriageलग्न