शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सकवार गावात हळदीच्या कार्यक्रमात तुफान मारामारी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 11:58 IST

कोविड -19 नियमांची सर्रास पायमल्ली ; गावचे सरपंच व पोलीस पाटील काय करत आहेत ?

ठळक मुद्देविरार पूर्व सकवार गावांत तांबडी कुटुंबातील सुनील नामक व्यक्तीचे लग्न रविवार दि 16 मे रोजी असल्याने त्याच्या हळदीसाठी पाच -पंचवीस नाही तर दोनशे हुन अधिक गावकऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार पूर्व भागातील सकवार गावांत ऐन कोरोनाचे वाढते संक्रमण असताना देखील हळदीच्या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांमध्ये आपसांत तुफान मारामारी झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या हळदीच्या कार्यक्रमात दोन ते तीन गटात कशी मारामारी झाली याचा संपूर्ण व्हिडीओच आता समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व सकवार गावांत तांबडी कुटुंबातील सुनील नामक व्यक्तीचे लग्न रविवार दि 16 मे रोजी असल्याने त्याच्या हळदीसाठी पाच -पंचवीस नाही तर दोनशे हुन अधिक गावकऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. याठिकाणी सर्वत्र कोविड नियमाचे कुठे ही अक्षरशः पालन झालेलं नाही याउलट जमलेल्या शेकडोंमध्ये काही शुल्लक कारणावरुन काही तासांनी मोठा बवाद झाला आणि त्यात दोन ते तीन गटात मारामारी देखील झाली. प्रसंगी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या ही उचलल्या गेल्या तर काही जण फुल टू ही होते. 

दरम्यान, शासनाच्या कोविड नियमानुसार लग्न समारंभा साठी केवळ 25 जणांची उपस्थिती व लग्न सोहळा दोन तासांत आटोपणे बंधनकारक असताना इथे गावांत शेकडो ग्रामस्थ जमेलच कसे असा प्रश्न देखील आता पोलीस व जिल्हा प्रशासनाला पडला आहे. तर बाजूलाच राहणाऱ्या सरपंच व गावच्या पोलीस पाटलाला ही कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी व हा तमाशा का बरं दिसला नाही. किंबहुना घडल्या प्रकारा बाबत विरार पोलीस व जिल्हाधिकारी या कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांवर काही कारवाई करणार का असा ही प्रश्न नियम पाळणारे सुज्ञ लोकं आता हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस