पालघरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; २० जणांना अटक, उर्वरित जिल्ह्यात बंद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 05:17 AM2020-01-30T05:17:56+5:302020-01-30T05:18:06+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अन्यायकारक तसेच घटनाविरोधी आहे.

Sticks charged at protesters in Palghar; Six were arrested in closed silence in the rest of the district | पालघरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; २० जणांना अटक, उर्वरित जिल्ह्यात बंद शांततेत

पालघरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; २० जणांना अटक, उर्वरित जिल्ह्यात बंद शांततेत

Next

पालघर : एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी आयोजित ‘भारत बंद’दरम्यान पालघर शहरात दुकाने बंद करण्यासह रास्ता रोको करणाºया आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. ६ महिलांसह २० लोकांना अटक केली. पोलिसांचा मनाई आदेश धुडकवणाºया भाजपच्या तीन नगरसेवकांसह सहा लोकांविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत त्यांना अटक केली. या प्रकरणामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अन्यायकारक तसेच घटनाविरोधी आहे. याला विरोध करण्यासाठी देशभर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे आयोजन केले होते. बुधवारी सकाळी आंदोलनकर्त्यांनी पालघर शहरात दुकाने बंद करण्याचे सत्र सुरू केल्यानंतर भाजप नगरसेवकासह, काही दुकानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून दुकानदारांना दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन केले. बंद केलेली दुकाने उघडली जात असल्याची माहिती मोर्चेकºयांना मिळाली. यामुळे हळूहळू सर्व मोर्चेकरी एकत्र जमू लागले. यावेळी भाजप, दुकानदार असोसिएशन आणि आंदोलनकर्त्यांनी आयडीबीआय बँकेसमोर एकमेकांसमोर येत परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. नंतर आंदोलनकर्त्यांनी कचेरी रोडवरील काही दुकाने बंद करायला लावून हुतात्मा स्तंभाजवळ काही वेळेसाठी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. याला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी आक्षेप घेत रास्ता रोको करण्यास मनाई करीत सर्वांना पोलीस ठाण्यात आणले.
मोर्चेकºयांचा हा जमाव माहीम रस्त्यावरील दुकाने बंद करीत करीत नगरसेवक माने यांच्या दुकानासमोर जमला. त्यांनी आपले दुकान बंद करण्यास नकार दिल्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली. सहा.पोनि.जितेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख आदींनी जमावाची समजूत काढून जबरदस्तीने दुकान बंद करायला लावणे कायदेशीर नसल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यावर जमावाकडून घोषणा देत रस्त्यावर बसून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न झाल्यावर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना नोटीस बजावूनही जमावातील काही लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी लोकमतला सांगितले.
या प्रकरणी भाजप नगरसेवक अरुण माने, नगरसेविका लक्ष्मी देवी हजारी, अलका राजपूत, शहराध्यक्ष तेज हजारी, व्यापारी असोसिएशनचे अरुण जैन, प्रदीप यादव यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला.

मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांची दुकाने बंद
जव्हार : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व शहरातील मुस्लिम संघटनांमार्फत जव्हार बंदचे आवाहन केले होते. याला शहरात संपूर्ण प्रतिसाद मिळाला. सर्व मुस्लिम नागरिकांनी दुकाने बंद ठेऊन निषेध केला. या बंदला शहरातील सुन्नी मुस्लिम ट्रस्ट बोर्ड आणि इतर मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला. काही ठिकाणी त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी व्यापाºयांनी बंदला विरोध दर्शवला.

मनोरमध्ये
संमिश्र प्रतिसाद
मनोर : भारत बंदला मनोरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच बसस्थानक परिसरात काही दुकाने वगळता सर्व बंद दिसत होते. जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होते. पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व इतर संघटनांतर्फे पाठिंबा जाहीर करून मनोर व मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेले हॉटेल, गॅरेज तसेच रिक्षा बंद केले होते. मनोर बाजारपेठ सकाळी बंद होती. परंतु भाजप आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ती दुकाने उघडण्यास सांगितले.

धमकावून बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न
तलासरी : भारत बंदला बुधवारी तलासरीत प्रतिसाद मिळाला नाही. बाजारपेठ सुरळीत सुरू होती. सकाळी तलासरी बाजारपेठेतील दुकाने धमकावून बंद करण्याचा प्रयत्न केला असता व्यापाºयांनी कडाडून विरोध केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. येथील व्यापाºयांनी दुकाने उघडली. तलासरी व्यापारी संघटनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र तलासरी पोलिसांनाही दिले होते. तरीही कार्यकर्ते व्यापाºयांना धमकावू लागल्याने तणाव निर्माण झाला.

कासा भागात बंदला अल्प प्रतिसाद
कासा : कासा - चारोटी भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. काही दुकाने वगळता उर्वरित व्यवहार सुरू होते. हॉटेल व भाजीपाल्याची दुकाने सकाळपासून सुरू होती. रिक्षा व प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि शाळा, महाविद्यालये सुरू होती. विशाल मॉलजवळ बंद ठेवण्यावरून झालेला वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडला.

डहाणूत कुठेही अनुचित प्रकार नाही
डहाणू : बहुजन क्रांती मोर्चाने दिलेल्या ‘भारत बंद’च्या हाकेला अल्प प्रतिसाद मिळाला असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. डहाणूरोड भागात सकाळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. संपूर्ण बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. आशागड येथे काही मुस्लिम लोकांनी दुकाने बंद ठेवली.

बहुजन क्र ांती मोर्चातर्फे वसईफाटा येथे आंदोलन
नालासोपारा : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने ‘भारत बंद’चे आयोजन केले होते. वसई तालुक्यात या बंदचा काहीही परिणाम झाला नाही. तुळींज पोलिसांनी जागोजागी पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावला होता. पश्चिमेकडील सोपारा गाव आणि पाटणकर नाका येथे शंभर ते दीडशे जणांनी नारेबाजी करून घोषणाबाजी केली. तुरळक ठिकाणी दुकाने बंद होती. वसई पूर्वेकडील वसई फाटा येथे हजार ते बाराशे कार्यकर्त्यांनी वसई स्टेशनकडे जाणारा एक रस्ता बंद करून मोर्चाचे आयोजन केले होते. या ठिकाणी सीएए आणि एनआरसीच्या विरोधात भाषणे करण्यात आली. येथे वालीव पोलिसांनी आरसीपी प्लाटून, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाºयांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. येथे होणाºया सभेसाठी, भाषणासाठी, लाऊडस्पीकर याची कोणतीही परवानगी न घेतल्याने वालीव पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. वसईत २५ ते ३० टक्केच बंद दिसून आला.

Web Title: Sticks charged at protesters in Palghar; Six were arrested in closed silence in the rest of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर