शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 23:41 IST

Virar-Vikramgad : लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला.

विरार/विक्रमगड : जिल्ह्यात विरार, विक्रमगडसह काही भागांत मंगळवारी मध्यरात्री पावसाचा शिडकावा झाला. या पावसाचा सुखद अनुभव घेणार तोच यादरम्यान दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने विरारवासीय घामाघूम झाले. दुसरीकडे एप्रिल महिन्याला सुरुवात होताच उष्णतेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला. या पावसाचा अंथरुणावरूनच सुखद अनुभव विरारवासी घेणार तोच दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने अंथरुणावरच नागरिक घामाने भिजले. परिणामी, सकाळी तीन-साडेतीनच्या सुमारास हवेसाठी घरादाराच्या खिडक्या उघडताना नागरिक दिसत होते. तास-अर्ध्या तासाने वीज आली तरी १५ मिनिटे झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने गर्मीत अधिकच भर पडली होती. पावसाचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळीदेखील उष्मा अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे बुधवारी संध्याकाळपासून पुन्हा एकदा सरकारने 'लॉकडाऊन'साठी कडक निर्बंध लावले असल्याने महावितरणकडून असाच 'वीज खेळखंडोबा' झाल्यास मागील वर्षीसारखा नागरिकांच्या संतापाचा पारा या वर्षीदेखील कायम राहू शकतो.दरम्यान, विक्रमगड तालुक्यात मंगळवारी रात्री आणि पहाटे पावसाने रिपरिप सुरू केली. पुन्हा पहाटे पावसाच्या सर आली तसेच सकाळी ढगाळ वातावरण असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण आंबा झाडावर सध्या कैऱ्या होऊ लागल्याने ढगाळ वातावरण व पावसामुळे या कैऱ्यांवर परिणाम होणार आहे.

निसर्गाचा लहरीपणा दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून गेल्या काही दिवसांत लांबलेले थंडीचे प्रमाण याचा परिणाम मनुष्यावरच नाही तर निसर्गावरसुद्धा होऊ लागला आहे. 

टॅग्स :Virarविरार