शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

शेतकऱ्यांना सौर विद्युत पंपाचा पर्याय उपलब्ध

By admin | Updated: February 26, 2017 02:25 IST

लोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील

- शशी करपे,  वसईलोडशेडींगची कटकट. भरमसाठ वीज बिलाचा बोजा. शेती-वाडीच्या पाणी पुरवठ्याची चिंंता. या सर्वांतून बागायतदार आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सौर उर्जेवरील विद्युत पंप वसईतील शनी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत, लोडशेडींगमधून सुटका, वीज बिलाची डोकेदुखी नाही, मेंटेनन्सही नाही उलट घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती होऊ शकते अशा अनेक कारणास्तव उपयुक्त असा पंप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे एकदाच गुंतवणूक केल्यानंतर त्यांना वर्षाेनुवर्षे दमडाही न मोजता शेतीसह घरगुती वापरासाठीही वीज निर्मिती करता येणार आहे. लोडशेडींगमुळे वसई तालुक्यायातील बागायतदार आणि शेतकऱ्यांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यातच भरमसाठ वीज बिलाची डोकेदुखीही असतेच. अनेकदा पाणी मुबलक असतांनाही वीजेअभावी शेतीला हव्या त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्यामुळे उन्हाळी शेती करणे जड होऊन बसले आहे. वेळी अवेळी जाणाऱ्या विजेमुळे विद्युत मोटर बंद पडल्यामुळे शेतीवाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी वसईतील शनि मंदिर ट्रस्टने हा प्रयोग केला. विशेष म्हणजे हा सौरउर्जा संच शेतीवाडीतील मोकळ्या माळरानावर,घराच्या गच्चीवर आपण लावू शकतो.तसेच या सौरउर्जेसाठी लावण्यात येणाऱ्या पँनलद्वारे तयार होणारी अतिरीक्त विज सहा बँटऱ्यांद्वारे स्टोर करून रात्रीच्या वेळी घरातही वापरू शकतो. गेली काही वर्षे सौरउर्जेवर आधारीत अनेक उपक्रम राबवले जात असतात. पर्यावरणासाठी महत्वाचे ठरणाऱ्या लाखो झाडांचे वाटप या करण्यात आले आहे. दर शनिवारी प्रसादाच्या रूपात वनौषधी रोपांचे वाटप केले जाते. वसईतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जी ९ या संकरीत टिश्श्यूकल्चर केळींच्या रोपांचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. झाडे लावा व झाडे जगवा यासाठी वसईतील शेतकऱ्यांकरीता वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही केले जाते. पर्यावरणमित्र हा सह्याद्री फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झालेले जयवंत नाईक यांनी शेतकऱ्यांना विजेअभावी शेतीला पाणी देण्यासाठी या सौरउर्जेवर आधारीत विज जनित्र संचाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन केले आहे.अशी केली साकारणी- सौरउर्जेवर आधारित वीज जनित्र संच प्रायोगिक तत्वावर शेतजमीनीवरील विहीरींवर लावले आहेत. या सौरउर्जा संचात सोलर पॅनलचा वापर करण्यात आलेला असून, त्याद्वारे तयार होत असलेल्या विजेचा विहीरीवरील मोटर्सला पुरवठा केला जातो. या संचासाठी २०० वॅटचे ९ पॅनल लावण्यात आलेले आहेत. ३ पॅनलच्या एका सिरीजद्वारे प्रति सेकंद ७२ वँट विजनिर्मीती होत असते.