शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:44 IST

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, प्रतियुनिट वाढणारे भाव आणि वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी अद्याप वीज पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी शासकीय निधीतून सौरऊर्जेवरील पथदिवे बसवून अंधकार दूर केला आहे. काही ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यात अंतर्भाव केला आहे. पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.औष्णिक, अणू, जल आणि पवनविद्युत हे ऊर्जानिर्मितीचे प्रमुख प्रकार आहेत. पवनऊर्जावगळता उर्वरित पर्यायांचा वापर होताना दिसतो. मात्र, वाढती लोकसंख्या आणि उद्योगनिर्मितीसाठी विजेची मागणी वाढत आहे. पर्यावरण, प्रदूषण आणि जमीन अधिग्रहण अशा विविध मुद्यांवरून नवीन प्रकल्प हाती घेताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय असून भारता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता शासनातर्फे विविध योजना सुरू आहेत. ग्रामीण भागात त्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे.पालघरमध्ये अद्याप काही भागांत वीज पोहोचली नसल्याने तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, सौरऊर्जेचा वापर वरदान ठरणार आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने त्यासाठी पाणीउपसा करण्यासाठी वीजपुरवठा गरजेचा आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाण्याच्या पाळ्या देता न आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीउपसा यंत्राची उपयुक्तता सिद्ध होते. महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी तीन एच.पी. आणि त्यावरील क्षेत्रासाठी पाच एच.पी.चा लाभ दिला जातो. या योजनेबाबत बºयाच शेतकऱ्यांना माहिती नाही.दरम्यान, ग्रामपंचायतींनी सुरू केलेला सौरऊर्जेचा वापर सुखावह आहे; मात्र टक्केवारी आणि भ्रष्टाचारामुळे कमी प्रतीची सामग्री वापरल्याने अनेक गावांतील सौरपथदिव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रकरणांत या सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे प्रकार घडूनही त्याविरु द्ध कायदेशीर कारवाई न होणे, या यंत्रणेचा देखभाल- दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने हा स्तुत्य उपक्र म बासनात गुंडाळण्याची वेळ ओढावली आहे.।वीजबिलाची कटकट नसल्याने ग्रामस्थांकडून स्वागतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सार्वजनिक कूपनलिका आणि विहिरींवर सौरऊर्जेवर मोटारपंप चालवण्याची लघु नळपाणीपुरवठा योजना ठक्कर बाप्पा योजनेतून राबवण्यात येत आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तालुक्यांतील डोंगरीपट्ट्यात ही योजना लाभदायक ठरत आहे. या पट्ट्यात वीज खंडित होत असल्याने त्याचे महत्त्व ग्रामीण महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. शिवाय, वीजबिल भरण्याची कटकट नसल्याने जिल्हावासीयांकडून त्याचे स्वागत होत आहे. शासकीय वसतिगृह, कार्यालये, टूमदार बंगले आणि मोठ्या कंपन्यांनी सौरऊर्जा वापरण्यास अवलंब केल्याने ही सकारात्मक बाब आहे.