शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नेटिझन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:13 IST

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.

- सुनील घरतपारोळ : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राजभवनात सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने मोठा राजकीय भूकंप घडून सर्व राजकीय गणिते चुकीची ठरवत सत्ता स्थापन केली. या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यात महाविकासआघाडी काही अंशी यशस्वी होण्याची चिन्हे असतानाच सकाळी - सकाळीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची बातमी येऊन थडकली आणि अनेकांची झोप उडाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.एकीकडे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादीबरोबर घरोबा केल्याने ‘पारदर्शक भ्रष्टाचार’ असे म्हणत नेटिझन्सनी नाराजीचा सूरही आळवला. ‘शपथविधी होता की, दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी - सकाळी आटोपला’, अशा शब्दात या घटनेची खिल्ली उडविण्यात आली. ‘भंडारा चल रहा था, अंदर गए तो हलवा खत्म, बहार आए तो चप्पल गायब’, ‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं, सपने देख रहा थे मैं’ अशा विविध प्रकारच्या पोस्टही टाकण्यात आल्या. तर, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे म्हणणाºया फडणवीसांना, ...पण एवढ्या सकाळी याल असं वाटलं नव्हतं’, असा खोचक टोलाही लगावला.‘पळून जाऊन राजभवनात दोघांचे लग्न’ अशा आशयाखाली नवरदेव देवेंद्र आणि वधू अजितदादा तर राज्यपाल भटजी अशा कल्पकतेच्या पोस्टमधून अनेकांचे मनोरंजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांकडे हात दाखवत म्हणत आहेत ‘हे कधी काय करेल काही सांगता येत नाही’ हे सूचक विधानही खूप काही सांगून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेती प्रश्नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचंच हे पीक आज आलेले आहे’ अशी कॉमेंट करण्यातही नेटिझन्स मागे नव्हते.तर माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांनुसार हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की, अखेर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनाही माहिती नव्हती असा मेसेज करून माध्यमांनाही लक्ष्यकरण्यात आले.या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण