शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये साचला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:24 IST

पाइपलाइन चोकअप; पाच दिवसांपासून काही चेंबर ओव्हरफ्लो

- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमध्ये सांडपाण्याबरोबरच डांबरसदृश रासायनिक गाळ (स्लज) कोणत्यातरी कारखान्यातून अनधिकृतपणे सोडण्यात आल्याने ही पाइपलाइन चोकअप झाली आहे. यामुळे पाच दिवसांपासून काही चेंबर ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे.तारापूर एमआयडीसीमधील टी झोनमध्ये असलेल्या कारखान्यांमधून निघणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी (इनफ्लूअंट) ८०० एमएम व्यासाच्या पाइपलाइनद्वारे २५ एमएलडी क्षमतेच्या जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) वाहून नेले जाते. परंतु त्या भागातील कुठल्यातरी कारखान्यातून रासायनिक सांडपाण्याबरोबरच रासायनिक गाळ अनधिकृतपणे सोडण्यात आल्याने त्या गाळाचे वाहत्या पाण्यात घट्ट डांबर सदृश वस्तूत रूपांतर होत असल्याने पाइपलाइन चोकअप होत आहे.पाच दिवसांपासून चोकअप काढण्याचे प्रयत्न सुरू असून पाईप लाईन मोकळी करण्यात काही तांत्रिक अडथळे येत असल्याने त्याला फारसे यश आलेले नाही. या पाइपलाइनमध्ये घट्ट झालेले डांबरसदृश गोळे काढणे मोठी डोकेदुखी झाली आहे. दरम्यान, स्लज सोडणाºया कारखान्याचा शोध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी घेत आहेत तर गुरुवार, २ जानेवारी रोजी तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (टीमा) पदाधिकारी ‘टी’ झोन मधील कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून समज देणार आहेत असे समजते.पैसे वाचवण्यासाठी पाइपलाइनमध्ये स्लज?उत्पादन प्रक्रि येनंतर जो काही रासायनिक गाळ निघतो तो गाळ मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे प्रक्रि येसाठी पाठविणे बंधनकारक आहे. परंतु ते प्रचंड खर्चिकही आहे. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी सांडपाण्याच्या पाईप लाईनमध्ये स्लज सोडले तर जात नाही ना? अशी शंका तारापूर एमआयडीसीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनमध्ये डांबर मिश्रित मटेरियल तयार होत होऊन ते हार्ड होत असल्यामुळे पाईप लाईन चोकअप होत आहे. पाच दिवसांपासून तिथे काम सुरू आहे. कॉस्टिक सोडा टाकून डांबर सदृश वस्तू वितळवून अडथळा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर सांडपाणी कलेक्शनची पाईपलाईन बंदही करता येत नाही अशी दुहेरी अडचण आहे.- राजेंद्र तोतला, उपअभियंता.