शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बाजारावरील मंदीचे सावट पौषासह सरले

By admin | Updated: February 24, 2016 02:56 IST

२१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला

बोर्डी : २१ व्या शतकात समाजावरील शुभ-अशुभतेचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना त्याच मानसिकतेतून पौष महिन्यात मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे माघ महिन्याला प्रारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा तसेच लग्नकार्य पार पाडण्याची घाई केली जात असल्याने बाजारातील मंदीचे सावट निवळले आहे.हिंदु धर्मात व्रत वैकल्यांना महत्वाचे स्थान असून पुजाविधी, मंगलकार्य कोणत्या महिन्यात करावे अथवा करू नये या बाबत धार्मिक संकल्पना आहेत. त्यानुसार चैत्र, श्रावण, भाद्रपद इ. महिन्यात सर्वाधिक पूजाविधी पार पाडले जातात. तर पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही. मात्र त्याला शास्त्राधार नसल्याचे पुरोहितांचे म्हणणे आहे. या शुभ -अशुभतेचा परिणाम माणसांच्या जीवनावर कितपत होतो हा संशोधनाचा विषय असला तरी बाजारातील आर्थिक उलाढालीवर नक्कीच होताना दिसून येतो. मंगलकार्याविना फुल ेव फळे बाजार, सोने व कपडे खरेदी, मंडप, डेकोरेशन, कॅटरींग, बॅन्जो, हॉल, व्हिडीओ शुटींग इ.वर मंदीच असते. दरम्यान माघ महिन्याला प्रारंभ झाल्यापासून गृहशांती, सत्यनारायण पूजा, साखरपुडा, लग्नकार्य इ. ची धावपळ सुरू झाली आहे. एखाद्या मुहूर्तासाठी भटजीकडे अडून बसणारे, तगादा लावणारे मनासारखा मुहूर्त वा तारीख न मिळाल्यास खट्टू होणारे महाभाग याच काळात दृष्टीस पडतात. विविध मंगलकार्यांना प्रारंभ झाला असून त्यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे. पुरोहितांची धावपळ सुरू असून मला वेळ नाही, दुसरा कुणीतरी पहा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (वार्ताहर) पौष महिन्यात मंगलकार्य पार न पाडण्याला कोणताच शास्त्रीय आधार नाही हे नागरीकांना पटवून दिले जाते. परंतु धार्मिक पगडा जबरदस्त असल्याने या महिन्यात धार्मिक विधी सहसा केले जात नाहीत.- धनंजय पंडीत, पुरोहीत डहाणू, आगारपौष महिना सरल्यानंतर माघ महिन्यात पूजाविधी, साखरपुडा, लग्नकार्य इ. करीता मंडप, रोषणाई, डेकोरेशन इ. मागणी वाढली आहे.- हसमुख किणी, मंडप व्यवसायीक, चिखले