शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव उड्डाणपुलाचा उतार खचला, गुणवत्ता दर्जा तपासण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:43 IST

Naigaon flyover : एक महिन्यापूर्वी सोपारा खाडीवरील पुलाचे पायलिंग न करता ठेकेदाराने आरसीसी ब्लॉक उभा केला होता. त्यामुळे पुलाचा एक भाग खचला होता.

पारोळ - मागील महिन्यात नायगाव पूर्वेतील सोपारा खाडीपुलाचा एक भाग खचल्याची घटना ताजी असताना आता नव्याने सुरू असलेल्या नायगाव उड्डाणपुलाचा उतार भाग खचल्याने एमएमआरडीए प्रशासन नागरिकांच्या व वाहनचालकांच्या जीवाशी खेळत असल्यामुळे कमालीचा संताप व्यक्त होत आहे.एक महिन्यापूर्वी सोपारा खाडीवरील पुलाचे पायलिंग न करता ठेकेदाराने आरसीसी ब्लॉक उभा केला होता. त्यामुळे पुलाचा एक भाग खचला होता. याप्रकरणी मोठा गदारोळ माजल्यानंतर बांधकाममंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचे पुढे काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात असताना आता नायगाव उड्डाणपुलाचा भागही खचल्याने ठेकेदाराच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सोपारा खाडीपुलाच्या घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनामार्फत सुरू असलेल्या नायगाव पूर्व-पश्‍चिम उड्डाणपुलाचे बांधकाम ठेकेदाराने तपासले असता नायगाव पूर्व भागात खाडीपुलाच्या उतारभागालगत असलेला उड्डाणपुलाचा एक भाग खचल्याचे निदर्शनास आले. याबाबत कोणाला कानोकान खबर लागण्याआधीच ठेकेदाराने जेसीबीच्या साह्याने तो संपूर्ण भाग खोदून टाकण्यात आला आहे.२०१५ साली नायगाव पूर्व-पश्‍चिम या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाचे काम सुरू असतानाच दोन वर्षांनी २०१७ रोजी पुलाच्या पश्‍चिमेकडील दोन भागांतील गर्डरचे काम कोसळले होते. त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम भागातीलच एका बाजूला तडा गेला होता. या दोन्ही पुलांचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने संबंधित ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. हा नागरिकांच्या जीवाशी जाणीवपूर्वक खेळ मांडला जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांच्या जीवाला अपाय होण्याचा धोकानिकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात जर दोन्ही पुलांचे काम कोसळले तर त्यामुळे नागरिकांच्या जीवाला अपाय होण्याचा धोका संभवतो. मोठी जीवितहानी होईल अशी भीती व्यक्त होत आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे वसई ते मुंबई हे अंतर २५ कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र दोन्ही पुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या बांधकामांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार