शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:24 IST

मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला.

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला. शिवसेनेने धरणे धरत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर पालिकेने पुन्हा कामाला सुरवात केली. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेतले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शांतीनगर सेक्टर दोनच्या जलकुंभातुन परिसरातील सेक्टर १, २, शांती विहार, पुनम सागर कॉम्प्लेक्स आदी भागासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पण सोमवारी दुपारी कामाचे श्रेय घेणे आणि नारळ फोडण्यावरुन प्रभागातील स्थानिक शिवसेना नगरसेविका दिप्ती भट आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरीया व हेतल परमार यांच्यात बिनसले. त्यातून भाजपा नगरसेवकांनी ठेकेदाराला काम बंद करायला लावत मंळवारी सकाळी महापौरांच्या हस्ते भुमिपूजन करुन काम सुरु करण्याचा पावित्रा घेतला.काम बंद झाल्याने शिवसेना नगरसेविका भट यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत जलवाहिनी टाकण्याचे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून काम सुरु केले न गेल्याने भट यांनी कामाच्याच ठिकाणी सोमवारपासून धरणे धरले. रात्रभर आणि मंगळवारी दुपारपर्यंत त्या धरणे धरुन होत्या. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदींनी काम बंद केल्याबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. तर माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापपौर प्रवीण पाटील, माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्षनेत लक्ष्मण जंगम, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शंकर वीरकर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील आदींनी भट यांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.अखेर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे हे मंगळवारी दुपारी भाजपा नगरसेवक दिनेश जैन व हेतल परमार यांना घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आले. नगरसेवकांना कामाची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच चौघे नगरसेवक एकत्र मिळून नारळ फोडू, अशी सूचना त्यांनी केली. त्यावरुन पुन्हा वादविवाद सुरु झाला. पुन्हा नारळ फोडायची गरज नाही, काम सुरु करा, असा पावित्रा भट आदींनी घेतला. शेवटी जैन व परमार या नगरसेवकांनीही नारळ फोडण्याचा मुद्दा बाजुला ठेवला. अखेर जलवाहिनी टाकण्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्यात आली आणि भट यांचे धरणे आंदोलन संपुष्टात आले.आधी दोन नगरसेवकांचा प्रभाग होता, तेव्हाही वेगवेगळ््या पक्षाच्या नगरसेवकांचे एकमेकांशी पटत नव्हते. आता चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने वाद जास्तच वाढणार असल्याची ही सुरूवात मानली जाते. नगरसेवकांकडून सामंजस्य दाखवले जाणे आवश्यक असून मुळात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे वाद विकोपाला जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा