शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांना नोटिसा बजावणाऱ्या ‘त्या’ पोलिसांना अखेर कारणे दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:29 IST

कवी, साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविणा-या पोलिसांना वरिष्ठांनी आता कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत.

वसई : येथील कवी, साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविणा-या पोलिसांना वरिष्ठांनी आता कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उपद्रव मूल्य असणाºया आणि ज्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्था बिघडेल अशाच व्यक्तींना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा पाठविण्यात येतात. त्यात वसई-विरारमधून ८०४ जणांना वसई पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध कवी सायमन मार्टीन तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्कुस डाबरे यांनादेखील सोमवारी सायंकाळी नोटिसा पाठविल्याने सर्वच क्षेत्रांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अखेर त्याच रात्री जनक्षोभामुळे उशिरा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या नोटिसा मागे घेण्याचे आदेश दिले.एकूणच हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे ज्या पोलिसांनी या नोटिसा काढल्या त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे पोलीस अधीक्षक सिंग यांनी मंगळवारी सांगितले.>‘लेखी आश्वासन द्या’सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी कवी, साहित्यिकांवरील नोटिसा मागे घेण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी सकाळी पोलीस सायमन मार्टीन यांच्या घरी नोटीस मागे घेण्यासाठी गेले. मात्र लेखी आश्वासन द्या त्याशिवाय नोटीस परत करणार नाही, असे मार्टीन यांनी सुनावल्यानंतर पोलीस माघारी फिरले. या प्रकारामुळे साहित्यिक, सुजाण नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार आल्याचे मार्टीन यांनी म्हटले.

टॅग्स :Policeपोलिस