शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

सोळा शिक्षकांना कारणे दाखवा , पालघर जि.प.चा गोंधळी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:33 IST

गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

- सुरेश काटेतलासरी  - गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वर्षभरातील सुट्टीच्या नियोजनामध्ये अचानक बदल केल्याने उत्सवकाळात सर्वच शिक्षकांचा गोंधळ उडाल्याने पालघर जि.प.तील नियोजनशुन्यता चव्हाट्यावर आली आहे.गणेशोत्सवाची सुट्टी जि.प.च्या परिपत्रका प्रमाणे दि .१४ ते १९ सप्टेंबर पर्यंत होती. त्या नुसार शिक्षकांनी आपले नियोजन केले. काही जणांनी गणेश उत्सवसाठी गावी जाण्या येण्याचे बस रेल्वेचे आरक्षणही केले. परंतु, अचानक पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या परिपत्रात बदल करुन सुट्टीचा कालावधी दि.१२ ते १७ सप्टेंबर असा करुन तसे आदेश पालघरचे जि.प. शिक्षणाधिकारी राजेश कंकाल यांनी ११ सप्टेंबर रोजी काढले. हा आदेश दुपारी ३ वाजे नंतर शिक्षकांच्या हाती पडला. त्यामुळे गावी जाणाºया शिक्षणाची मात्र गोची झाली. अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांनी आपले परगावी जाणे रद्द केले तर काहीजण धावपळ करून १८ तारखेला कामावर रुजू झाले. काहींनी रजेचे अर्ज टाकून ते मुख्याध्यापकांकडून मंजुर करून घेतले, तर काहींना अर्ज करता आला नाही. हक्काच्या रजा शिल्लक असल्याने त्या वापरु असा विचार काहींनी केला. सुटयात बद्दल झाला तरी शिक्षक १८ सप्टेंबरच्या शाळांत रुजू झाले आदेशानुसार शाळांमध्ये ‘चलो जितें है’ हा लघुपट ही दाखिवला त्याचे फोटो ही अधिकाºयांना पाठविल. मात्र, तरीही अधिकाºयांनी शिक्षकांना वेठीस धरल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी शिक्षकांचा अहवाल मागितला व गैरहजर असलेल्या शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारला आहे.गणेश उत्सव काळात ४३ शिक्षकांनी रजा मंजूर करून घेतल्या तर १६ शिक्षकानी रजेचे अर्ज न दिल्याने त्याना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसा देताना ज्यांनी रजा मंजूर करून घेतल्या आहेत त्यांनाही नोटिस दिल्या आहेत. शिक्षक संघटनेनेही या कारवाईचा निषेध केला असून कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाल यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.पंतप्रधानांच्या जीवनपटासाठी...या आदेशात स्पष्ट करण्यात आले की, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक सुट्ट्याच्या यादीत गणपतीची सुट्टी दि.१४ ते दि.१९ होती परंतु ती सुट्टी दि.१२ पासून १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तसेच दि.१८ सप्टेंबर रोजी शाळा नियमितपणे सुरू राहील व त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जितें है’ हा लघुपट सर्व शाळा मधून दाखविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असा आदेश काढण्यात आला होता.लघुपटासाठी मनमानी पद्धतीने शिक्षण विभागाने काढलेला आदेशरजा मंजूर करण्यात यावी. पगार कपात करण्यात येऊ नये.-दामू बरफ,अध्यक्ष, शिक्षक परिषद संघटना, तलासरीहक्काची रजा शिल्लक असल्याने किरकोळ रजा मंजूर करावी. प्रशासनाची ही कारवाई योग्य नाही.- गोविंद डोंबरे,अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना ,तलासरीगैरहजर असलेल्या १६ शिक्षकाना नोटिस दिल्या आहेत. लवकरच योग्यती कारवाई होईल.- सदानंद जनाथे, गट शिक्षण अधिकारी, तलासरी

टॅग्स :Teacherशिक्षकVasai Virarवसई विरार