शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शॉर्ट फिल्म ‘She’ला मिळाले दादासाहेब फाळके ज्युरी अ‍ॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:39 IST

सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई (स्रं्र)या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

- सुनील घरतपारोळ : सन २०१२ मध्ये आॅस्कर विजेत्या लाईफ आॅफ पाई या हॉलिवूडपटा मधून छोट्या पाईच्या बाल भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चेत आलेल्या वसईच्या आयुष टंडनने बाजीराव मस्तानी मधूनही नानासाहेब पेशवा साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. आता आयुषने त्याहून मोठी उडी घेतली आहे. मुली आणि स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीचा विषय घेऊन, पुरु षी कामुकतेच्या विकृत मानसिकतेवर प्रहार करणाº्या ‘रँी’ या शॉर्ट फिल्म मधून आयुषने मध्यवर्ती भूमिका साकारली असून, या शॉर्ट फिल्मने खूप मोठा सामाजिक संदेश देत, दिल्लीच्या दादासाहेब फाळके स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड ला गवसणी घातली आहे.शुक्र वारी दिल्लीत झालेल्या यंदाच्या दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड सोहळ्यावर फरहान अख्तर निर्मित आणि रंजीता कौर दिग्दिर्शत ‘शी’ या तीन मिनिटांच्या हिंदी शॉर्ट फिल्मचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. अगदीच अल्पसंवाद, उत्कट अभिनय, समर्पक संगीत आणि छोटया छोट्या प्रसंगातून फुलत गेलेल्या सुप्त कथानकातून स्त्री-जन्माचा भोग आणि समाजातील बिभत्स पौरूषत्वाचा खराखुरा चेहरा ‘रँी ‘शी’ (अर्थात ती)मधून दर्शकांसमोर ठेवला आहे. या फिल्म मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आपले अभिनय कौशल्य दाखिवणार्या वसईच्या आयुष टंडनने आणखी एक भरारी घेऊन वसईची कला क्षेत्रातील पताका पुन्हा एकदा उंचीवर नेऊन ठेवली आहे.फरहान अख्तर यांच्या मर्द आॅफिशियल या स्वत:च्या यु-ट्युब चॅनेलवर नोहेंबर २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रँी शी या शॉर्ट फिल्म ला आतापर्यंत २.८ मिलियन व्ह्यूज आणि पाच हजार कॉमेंट आले आहेत. यात एक तरु ण युवतीचे रूप घेऊन, बाहेर पडतो. एक मुलगी म्हणून वावरतांना त्याला ज्या विकृत पुरु षी कामुकतेच्या नजरा आणि स्पर्शाचा सामना करावा लागतो. त्याचे वास्तववादी दर्शन यात चित्रित झाले आहे. आलेला अनुभव घेऊन शेवटी हा तरु ण, अर्थात आयुष आपला स्त्री-वेश, मेकअप उतरवून, मैत्रिणीला म्हणतो, मै एक घंटा नही सह पाया ये घिनौनापन, हर वक्त, हर जगह, आप कैसे सह पाती हो? आणि फिल्म संपते. आयुष व्यतिरिक्त या फिल्म मध्ये नेहा शर्मा, कनिष्का अग्रवाल, गयासुद्दीन शेख, भूपेश बेंडकर, निखिल, अश्विनी कुमार, वैभव दीक्षित यांनीही भूमिका केल्या असून, इकबाल राज यांनी कथा लिहिली आहे.आयुषला करायचा आहे अ‍ॅक्टींगमध्येच करिअरया निमित्ताने दै लोकमत संवाद साधतांना आयुष म्हणाला, ‘शी’ ‘रँी’ मधून खूप चांगला जनजागृतीपर संदेश दिला गेला असून, त्याचा अधिक प्रचार व प्रसार व्हायला हवा. यातील यश हे आम्हा सर्व टीमचे असून, या पुरस्कारातून प्रेरित होऊन पुढे आणखी अधिक चांगला अभिनय करेन.माझे पिता हतींदर टंडन यांनी हिंदी रंगभूमीवर चांगला अभिनय केलेले असून, मी त्यांच्या कडूनच प्रेरणा आणि अभिनयाचे धडे घेतले. दर्शकांना माझे काम पसंत असल्याने आणखी कामे येत असून, आता मी अभिनयातच करियर करायचे ठरवलेआहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcinemaसिनेमा