शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भाजपाच्या खेळीने शिवसेनेचा विश्वासघात , पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसली : अनंत तरेंचे शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:44 IST

हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषद समिती सभापतींच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत नेहमी प्रमाणे भाजपने आपले वर्चस्व राखले तर राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजन विकास आघाडी सह भाजपने अचानक पाठिंबा दर्शविल्याने शिवसेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसल्याची प्रतिक्रि या संपर्क ...

हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषद समिती सभापतींच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत नेहमी प्रमाणे भाजपने आपले वर्चस्व राखले तर राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजन विकास आघाडी सह भाजपने अचानक पाठिंबा दर्शविल्याने शिवसेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसल्याची प्रतिक्रि या संपर्क प्रमुख अनंत तरे ह्यांनी दिल्याने जिल्ह्यातील युती संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या उर्विरत अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली होती. उपाध्यक्षपदासाठी सेनेच्या प्रकाश निकमला भाजपने विरोध दर्शवल्याने ऐनवेळी निकम यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.जिल्हा परिषदेत भाजपचे २१ सदस्य, शिवसेनेचे १५ , बहुजन विकास आघाडी चे १०, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे ५७ सदस्य निवडून आले होते.जिल्हा परिषदेच्या १४ आॅगस्ट रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी नंतर उर्विरत विशेष समिती सभापतीच्या निवडीसाठी भाजपचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, बाबजी काठोले, जिल्हाध्यक्ष आ. पास्कल धनारें सह सेनेचे संपर्क मंत्री अनंत तरे, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, शिरीष चव्हाण, माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांच्या चार बैठका पार पडल्या होत्या. त्यात भाजपच्या कोट्यातील एक सभापती पद सेनेला देण्याबाबत एकमताने ठरल्याचे अनंत तरेंनी सांगितले होते.प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रि येला सुरु वात केल्यानंतर प्रथम महिला बालकल्याण व समाज कल्याण विभागाच्या सभापती पदासाठी एकेकच अर्ज आल्याने वाडा गटातून निवडून आलेल्या भाजपच्या धनश्री चौधरी ह्यांची बालकल्याण तर आलोंडे गटातून निवडून आलेल्या दर्शना दुमाडा ह्यांची समाज कल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाली. तर कृषी व पशुसंवर्धन आणि बांधकाम-आरोग्य पदाच्या सभापती पदा साठी सेनेकडून घनश्याम मोरे व राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांनी अर्ज भरले असताना भाजप ने एक सभापती पद सेनेला देण्याचे मान्य केले असताना अचानक भाजपच्या माजी सभापती अशोक वडे ह्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सेनेला धक्का दिला.दोन सभापती पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गजरे ह्यांनी घेतलेल्या निवडणुकीत अशोक वडे ह्यांना ३३ मते,तर राष्ट्रवादीच्या दामोदर पाटलांना भाजप व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दर्शविल्याने त्यांना ३३ मते तर सेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना अवघी १६ मते पडली.ह्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे व राष्ट्रवादीचे मिळून ९ सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नाही. तर काँग्रेसच्या एक सदस्यानेही राष्ट्रवादी-बहुजन-भाजप आघाडीच्या उमेदवाराला आपले मत दिल्याने जिल्ह्यात नवीन समिकरणाने जन्म घेतल्याचे दिसून आले.कारणे दाखवाजिल्हापरिषदेत भाजप, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही पक्षाशी राष्ट्रवादी पक्षाशी कोणतीही आघाडी नव्हती. राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजनच्या कोट्यातून सभापती पद मिळाल्याने पक्ष्याच्या भूमिके विरोधात त्यांनी हे पद कसे स्वीकारले ह्या बाबत त्यांना करणे दाखवा नोटीस पाठविण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.- सुनील भुसारा,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना