शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिजान ड्रग्स घ्यायचा अन् तुनीषाला उर्दू शिकवायचा; आईचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:58 IST

मोलकरीण म्हणते, लग्नाची सुरु होती तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा : अभिनेत्री तुनीषा शर्मा मृत्यू प्रकरणात आता नवे वळण आले आहे. तुनीषाची आई वनिता शर्मा हिने शिजान खानवर ड्रग्स घेतल्याचा आणि तिला उर्दू शिकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिच्या मोलकरणीने तुनीषाची आईदेखील शिजानच्या घरी ये-जा करत असल्याचे पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान, वालीव पोलिसांनी शिजानच्या मैत्रिणीचीही चौकशी केली असून तुनीषाच्या मृत्यूप्रकरणी वालीव पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांचे जबाब नोंदवले आहेत.

तुनीषाच्या घरी घरकाम करणारी बाई आणि आईच्या दाव्यामुळे नवे वळण आले आहे. तुनीषाच्या आईने शिजान ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच शिजानला भेटल्यानंतर तुनीषाची जीवनशैली बदलली होती. तिने हिजाब घातला होता आणि शिजान तिला उर्दू शिकवत होता. तिच्या मृत्यूनंतर शिजानने तिला मदत केली नाही. मात्र, तो किती दिवसांपासून ड्रग्ज घेत होता, याची माहिती नसल्याचेही तिने सांगितले आहे. पोलिसांच्या चौकशीत अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने ते दोघे त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. इतकेच नाही तर तुनीषा आणि शिजान एकमेकांच्या घरी ये-जा करायचे. दोघे ४ ते ६ दिवस एकमेकांच्या घरी राहिले होते. तुनीषाची आई वनिताही शिजान खानच्या घरी जायची, असा दावा केल्याचे पोलिस सूत्रांकडून कळते. पोलिसांनी शिजानच्या मैत्रिणीची केली चौकशी आहे.

वनिता यांनी यापूर्वीही शिजानवर अनेक मुलींशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. व्हॉट्सॲप चॅट्समधून पोलिसांना शिजानच्या गुप्त मैत्रिणीबद्दल माहिती मिळाली.  आता पोलिसांनी तिचीही चौकशी केल्याचे कळते. मात्र, ही गर्लफ्रेंड कोण आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शनिवारी तुनीषाने मेकअप रूममध्ये पंख्याला लटकून आत्महत्या करण्यापूर्वी शिजानने या गुप्त मैत्रिणीशी दोन तास बोलणे केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून कळते. 

व्हॉट्सॲप चॅट्स शिजानने केले डिलीट

वालीव पोलिसांनी तीन फोन जप्त केले आहेत.  यापैकी तुनीषाचा मोबाइल अद्याप अनलॉक झालेला नाही.  पोलिसांनी शिजानच्या फोनवरील व्हॉट्सॲप चॅट्सवरून अडीचशे ते तीनशे पानांची फाइल तयार केली आहे. तुनीषा आणि शिजान, शिजान आणि तुनीषाची आई यांच्यात चॅट झालेले आहेत. यामध्ये शिजानचे त्याच्या अन्य मैत्रिणीशी झालेल्या चॅटचाही समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Tunisha Sharmaतुनिशा शर्मा