शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धामणीची सुरक्षा धोक्यात, सीसीटीव्हीचे १३ कॅमेरे दोन महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:57 AM

सूर्या नदीवरील धामणी धरणाच्या सुरक्षेसाठी २०११ साली प्रवेशद्वार, विश्रामगृह, पाणी सोडण्याचे पाच गेट व धरणाच्या परिसरात बसविण्यात आलेले १३ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत.

- शशिकांत ठाकूरकासा : सूर्या नदीवरील धामणी धरणाच्या सुरक्षेसाठी २०११ साली प्रवेशद्वार, विश्रामगृह, पाणी सोडण्याचे पाच गेट व धरणाच्या परिसरात बसविण्यात आलेले १३ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या बारीक-सारीक घटनांवर लक्ष ठेवणे येथील कर्मचाºयांना अशक्य झाले आहे. या धरणांमध्ये आज २७६.३५ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातून वसई विरार महानगरपालिका, तारापूर टैप्स, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पॉवर स्टेशन डहाणू, पालघर नगरपालिका व २६ गावे, वाढीव दांडी वानगाव या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. यातून पाटबंधारे विभागाला दरवर्षी साधारणपणे १८ ते २० कोटींचा महसूल मिळतो. तसेच शेती सिंचनातून वर्षापोटी ४ ते ५ लाखांचा महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असून देखील हे कॅमेरे दोन महिन्यात दुरुस्त ही केले नाही किंवा नवीन बसविण्यात आले नाहीत.सूर्या प्रकल्प अंतर्गत एकूण दोन धरणे आहेत. त्यापैकी कवडास हा बंधारा १९७८ ला पूर्ण झाला तर धामणी या धरणाला १९७४ ला परवानगी मिळून त्याचे काम १९९० ला पूर्णत्वास गेले. सिंचनासाठी तसेच डहाणू व पालघर भागातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने सूर्या प्रकल्प साकारला. त्यापैकी कवडास बंधाºयातून डावा व उजवा कालवा सुरू करण्यात आला. मुख्य कालवा हा ८० किमी चा असून त्याअंतर्गत इतर मायनर कालव्याची लांबी ३०० ते ३५० किमी असून त्यांच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पाच्या कालव्याद्वारे सुमारे १०० गावांना व त्यातील शेतीला उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. १४ हजार ५०० हेक्टर जमीन त्यातून सिंचनाखाली आली आहे. धामणी धरणाचे दरवाजे २००९ साली लावण्यात आले व १०० टक्के पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. सूर्या प्रकल्पाचा आतापर्यंतचा खर्च ४८० कोटी झाला असून त्यापैकी भूसंपादनाचा खर्च १२० कोटी, आस्थापनेवरील खर्च ८० कोटी व प्रत्यक्ष कामाचा खर्च २८० कोटी इतका झालेला आहे. धामणी धरणाच्या एकूण पाणीसाठयापैकी २२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित असून यातले ७० दशलक्ष घनमीटर पाणी वापरले जाते. या धरणातून आतापर्यंत शासनाला २७० कोटींचा बिगर सिंचनाचा महसूल मिळाला आहे परंतु धरणाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्त करावे अथवा नव्याने बसवावे असे काही सरकारला वाटत नाही.धरणाजवळ जलविद्युत प्रकल्प आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.>देखरेखीची सगळीच बोंबसीसीटीव्ही कॅमेरे लावले की त्याची कंट्रोल रुमही उभारावी लागते. ती उभारली आहे का? कॅमेºयातून झालेले चित्रीकरण रेकॉर्ड होते का? ते व्यवस्थित साठविले जाते का? याचीही माहिती कुणाला नाही. त्यामुळे हे कॅमेरे केवळ शोभेसाठी ठेवले आहेत काय? असा प्रश्न जनतेला पडतो आहे. हे कॅमेरे सुरू आहेत की बंद याकडेही कोणाचे लक्ष नसते. बातम्या आल्या की यंत्रणा खडबडून जागी होते एवढेच!धरणावर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मंजुरी मिळताच लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.- निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प