शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांच्या बालकाचा ७२ तासांत शोध, पालघर पोलिसांची तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:19 IST

वाणगाव रेल्वे स्टेशन वरील एका कामगार महिलेच्या दहा महिन्याच्या बालकास पळवून नेणाºया पती-पत्नीस पोलिसांनी वापी येथून अटक केली. तक्रार दाखल होताच अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींना अटक करुन पोलिसांनी बालकाला सुखरुप पणे आईच्या स्वाधीन केले. ह्या प्रकरणात एखाद्या टोळीचा हाथ आहे का ह्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी दिली.

पालघर : वाणगाव रेल्वे स्टेशन वरील एका कामगार महिलेच्या दहा महिन्याच्या बालकास पळवून नेणाºया पती-पत्नीस पोलिसांनी वापी येथून अटक केली. तक्रार दाखल होताच अवघ्या ७२ तासांमध्ये आरोपींना अटक करुन पोलिसांनी बालकाला सुखरुप पणे आईच्या स्वाधीन केले. ह्या प्रकरणात एखाद्या टोळीचा हाथ आहे का ह्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी दिली.वाणगाव स्टेशनच्या ट्रॅकच्या दुरु स्तीचे काम करणाºया बिहार येथील सुलो उपेंद्र माझी ही महिला आपल्या पिंकू ह्या मुलाला जवळच उभारलेल्या राहुटीत सोडून पतीसह बाजूला काम करण्यास निघून गेले. काही वेळाने ती परत आल्यानंतर मुलगा नसल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांची मदत घेतली.पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे व अपर अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी या कामी तीन ते चार पथके तैनात करून मुंबई, ठाणे, गुजरात च्या दिशेने तपास सुरू केला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे ह्यांना आपल्या तपासा दरम्यान एक महिला कामाची मागणी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. तसेच ती आपली पिशवी विसरून गेल्याचे कळले.त्या पिशवीत एका छाट्या कागदावर गुजराती भाषेत एक मोबाईल नंबर आढळून आला आणि तपासाची चक्रे गुजरातच्या दिशेने वळली. त्या आधारे पोलिसांनी वापी गाठले आणि आरोपी पूजा संतोष पटेल (२६), तिचा पती संतोष कंठाली पटेल (३०) ह्यांच्या सोबत पळवून आणलेल्या पिंकू ला ताब्यात घेतले. ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस