शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

दिवाळीच्या मुहूर्तावर साधली गेली समुद्रकिनारी सिगल दर्शनाची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:40 IST

या दिवाळीला म्हणावी तशी थंडी नसली, तरीही डहाणूतील समुद्रकिनारी सिगल पक्षांचे आगमन झाले आहे. दरम्यान ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी पक्षी दर्शनाची पर्वणी लाभल्याने पर्यटकांसह स्थानिकही सुखावले आहेत.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी  - या दिवाळीला म्हणावी तशी थंडी नसली, तरीही डहाणूतील समुद्रकिनारी सिगल पक्षांचे आगमन झाले आहे. दरम्यान ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी पक्षी दर्शनाची पर्वणी लाभल्याने पर्यटकांसह स्थानिकही सुखावले आहेत. या भागात आगामी काळात पक्षी निरीक्षणाकरिता पर्यटनाचे नवे दालन विकसित होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.तालुक्यातील नरपड-चिखले खाडी पूलानजीकच्या किनारी भागात असलेल्या वाळूच्या बेटावर सिगल पक्षांचे थवे दरवर्षी हिवाळ्यात दृष्टीस पडतात. या वेळी दिवाळीला थंडी नसतानाही त्यांचा वावर आढळून आला आहे. थव्यांनी आढळणारे हे पक्षी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. निर्मनुष्य तसेच कोणत्याही सोयी -सुविधा नसतांनाही हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी परगावतील पर्यटकही मोठी गर्दी करतात. वाळू बेटावर पक्षी निरीक्षणासाठी कॅमेरा घेऊन तासंतास घालवणारेही अधिक आहेत. किनाºयावर थव्यांमधून दाटीवाटीने बसलेले, घिरट्या घालणारे आणि लाटांवर पोहणारे सिगलांचे थवे पाहण्यासाठी मागील काही वर्षांपासून पर्यटक विकेंडला दिसू लागले आहेत. त्यांना समुद्रससाणा, खंड्या, टिटवी, बगळ्यांच्या विविध जातीही दृष्टीस पडत आहेत. नरपड-चिखले खाडीपूला प्रमाणेच घोलवड मरवाडा, टोकेपाडा, कोलपाडा खाडीनजीकचे कांदळवन, बोर्डीचा किनारी सिगलांचे दर्शन होते. शिवाय जस-जशी थंडी पडू लागेल, तसे लहान-मोठे विविध जातींचे आण िआकारातील स्थलांतरीत पक्षीही विनासायास दिसतील.दरम्यान दिवाळीनिमित्त पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असून मोठ्या संख्येने परगावतील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांना पक्षी निरीक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विशेषत्वाने पक्षी निरीक्षणकरिताच पर्यटक येतील आणि पर्यटनाचे दालन उघडे होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. या करिता समुद्रकिनारी अवैध रेती चोरी, समुद्र अधिनियम पायदळी तुडवून पाणथळ जागांवर होणारे जैवविविधतेला धोका पोहचिवणारे बांधकाम थांबणे आवश्यक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार